सोलापुरात एकाच दिवशी 35 जण कोरोना मुक्त, 18 नवीन रुग्ण, एकूण संख्या 488

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

आज कोरोना मुक्त झालेल्या 35 जणामुळे सोलापुरातील 210 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 34 झाली असून रुग्णालयात अद्यापही 244 उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना चाचणीचे 203 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आज नव्याने 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सोलापुरातील एकूण बाधित व्यक्तींची संख्या 488 झाली आहे. 19 पुरुष आणि 16 महिला असे तब्बल 35 जण आज एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

 आज नव्याने सापडलेल्या 18 रुग्णांमध्ये अशोक चौकातील एक महिला, न्यू पाच्छा पेठ येथील एक पुरुष व दोन महिला, उत्तर कसबा पत्रा तालीम येथील एक पुरुष, कुर्बान हुसेन नगर येथील एक पुरुष, केशव नगर झोपडपट्टी येथील एक महिला, भवानी पेठेतील धुम्मा  वस्ती येथील एक पुरुष, नीलम नगर येथील एक पुरुष, सिव्हिल हॉस्पिटल क्वॉर्टर्स येथील एक महिला, बेगम पेठ येथील एक पुरुष, बुधवार पेठेतील एक महिला, न्यू बुधवार पेठेतील एक पुरुष, कुमार स्वामी नगर येथील एक महिला, रेल्वे लाईन येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील एक पुरुष, बाळीवेस येथील एक पुरुष, पाछा पेठ येथील एक महिला असे 18 जण आज कोरोनाबाधित आढळले आहेत. उत्तर सदर बझार लष्कर परिसरातील 72 वर्षे पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला 17 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

आज कोरोना मुक्त झालेल्या 35 जणामुळे सोलापुरातील 210 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 34 झाली असून रुग्णालयात अद्यापही 244 उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना चाचणीचे 203 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur on the same day 35 corona free, 18 new patients, total number 488