सोलापूर-विजयपूर मार्ग 20 ऑक्‍टोबरपर्यंत बंद ! कंबर तलावाजवळील रेल्वे ब्रिजखाली ड्रेनेज टाकण्याचे काम 

तात्या लांडगे
Monday, 5 October 2020

ठळक बाबी... 

  • सोलापूर- विजयपूर महामार्गावरील कंबर तलावाजवळ रेल्वे ब्रिजखाली ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम महापालिकेने घेतले हाती 
  • मंगळवारी (ता. 6) सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 20 ऑक्‍टोबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार काम 
  • ड्रेनेजचे काम सुरू असल्याने ब्रिजचा रस्ता खचण्याची महापालिकेने व्यक्त केली दाट शक्‍यता 
  • कामगारांच्या जीवितास धोका तर रस्त्यावरील रहदारीस अडथळा होऊन अपघात होण्याची शक्‍यता असल्याने हा मार्ग बंद ठेवण्याचा घेतला निर्णय
  • सोलापूर- विजयपूर महामार्गावरील पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका झाशीची राणी पुतळा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी राहणार बंद

सोलापूर : सोलापूर विजयपूर महामार्गावरील कंबर तलावाजवळील रेल्वे ब्रीज खालून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हे काम उद्या मंगळवारी सुरु होणार असून मंगळवारी (ता. 20) रोजी सायंकाळी सहा वाजता हे काम संपणार आहे. त्यामुळे हा मार्ग या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी घेतला आहे.

ठळक बाबी... 

  • सोलापूर- विजयपूर महामार्गावरील कंबर तलावाजवळ रेल्वे ब्रिजखाली ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम महापालिकेने घेतले हाती 
  • मंगळवारी (ता. 6) सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 20 ऑक्‍टोबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार काम 
  • ड्रेनेजचे काम सुरू असल्याने ब्रिजचा रस्ता खचण्याची महापालिकेने व्यक्त केली दाट शक्‍यता 
  • कामगारांच्या जीवितास धोका तर रस्त्यावरील रहदारीस अडथळा होऊन अपघात होण्याची शक्‍यता असल्याने हा मार्ग बंद ठेवण्याचा घेतला निर्णय
  • सोलापूर- विजयपूर महामार्गावरील पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका झाशीची राणी पुतळा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी राहणार बंद

कंबर तलावाजवळील हा महामार्ग बंद राहणार असल्याने वाहनांसाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. विजयपूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी जुना विजयपूर नाका, मोदी हुडको कॉलनी, मोदी स्मशानभूमी, मोदी बोगदा, मोदी पोलीस चौकी, सात रस्ता असा मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर सोलापूरकडून विजयपूरकडे जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सात रस्ता, मोदी पोलीस चौकी, मोदी स्मशान भूमी, हुडको कॉलनी, जुना विजयपूर नाका, असा पर्यायी मार्ग उपलब्ध असणार आहे. तसेच विजयपूरकडून सोलापूरकडे येणारी जड वाहने सैफुल, आत्तार नगर, प्राधिकरण रोड, डी मार्ट, आसरा चौक, महावीर चौकातून पुढे जातील, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. तर सोलापूरकडून विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हाच रस्ता उपलब्ध असणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur-Vijaypur route closed till October 20! Drainage work under the railway bridge near Kambar Lake