सोलापूरकरांनो शिस्त पाळा अन्यथा, लॉकडाउन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

सोलापूरकरांनी शिस्त पाळली तर लॉकडाउन करण्याची वेळ येणार नाही. जर शिस्त पाळली नाही तर नाईलाजास्तव लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल अशी माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूरः कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात पंधरा दिवसाचा लॉकाडाऊन होणार अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून होती. त्या चर्चेला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज तुर्तास पूर्णविराम दिला. सोलापूरकरांनी शिस्त पाळली तर लॉकडाउन करण्याची वेळ येणार नाही. जर शिस्त पाळली नाही तर नाईलाजास्तव लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल अशी माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनीधी, व्यापारी, नागरिक या कोणासाठीच लॉकडाउनचा निर्णय आनंददायी नाही. जर कोरोना रोखण्यासाठी लोक शिस्त पाळत नसतील तर शासन म्हणून आम्हाला लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी सांगीतले. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या ऍटींजन टेस्ट करण्यास सुरवात होणार आहे. या टेस्ट मुळे अर्ध्या तासात कोरोनाचा रिपोर्ट समजणार आहे. या टेस्टचा निकाल पाहून सोलापूरातील लॉकडाउन संदर्भात येत्या काळात निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेताना लोकप्रतिनीधी यांच्याशी चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapurkars follow discipline otherwise, lockdown