कृषी क्षेत्रातील तज्ञांशी कोणी साधला झूमऍपद्वारे संवाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

सोलापूर ः परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) वस्त्रोद्योग व कृषी उत्पादनाचे निर्यात केंद्र बनवण्यासाठी देशातील एक्‍सपोर्ट सेंटर म्हणून सोलापूरला मान्यता दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवीर सोलापूर सोशल फाउंडेशन आणि फियो यांच्या समन्वयाने जिल्ह्यामधील सध्याची ऍग्रीकल्चर सेक्‍टरची स्थिती जाणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शेतकरी उत्पादक, बागायतदार, विविध कंपनीच्या विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्थेशी झुम ऍपद्वारे विविध बैठकांतून माहिती घेऊन शासनाकडे सादर केली आहे. 

नुकत्याच झालेल्या बैठकीत माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, फियोचे संचालक प्रशांत सेठ, सहायक संचालक मोहित हंस, जिल्हा उद्योग केंद्राचे बाळासाहेब यशवंते, अपेडाचे एम. ई. रवींद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना शर्मा, सोलापूर सोशल फाउंडेशनचे संचालक अभिजित पाटील, पुणे येथील सल्लागार भूषण कुलकर्णी, कृषिभूषण अंकुश पडवळे, भगवंत एक्‍सपोर्टरचे मयूर जाधव यासह जिल्ह्यातील विविध डाळिंब उत्पादक, केळी उत्पादक, साखर कारखान्यंचे संचालक यांनी बैठकीत वेगवेगळे मुद्दे मांडले. 

फियोचे संचालक सेठ यांनी जिल्ह्यातील विविध कृषी उत्पादने यांची स्थिती, निर्यात संधी याबाबत सादरीकरण केले. डॉ. शर्मा यांनी डाळिंबाचे क्‍लस्टर सांगोला येथे सुरू होत असल्याचे सांगितले. अपेडाचे रवींद्र यांनी जिल्ह्यात डाळिंब आणि केळीचे क्‍लस्टर होत असल्याचे सांगितले. रेसिड्यू फ्री उत्पादनाकरिता आत्मा आणि नाबार्डच्या सहकार्याने स्वतंत्र प्रकल्प राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पडवळे यांनी मंगळवेढा आणि सांगोला तालुक्‍यातील 500 शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन करीत असल्याचे सांगितले. भूषण कुलकर्णी यांनी फ्रोजन स्वीटकॉर्नकरिता युरोप, आखाती देश आणि रशियन देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे नमूद केले. डॉ. संतोष थिटे यांनी माजी सहकारमंत्री आमदार देशमुख यांनी जिल्ह्यात रेशीम पार्कची उभारणी केल्याचे व त्यामुळे जिल्ह्यात रेशीम उत्पादन आणि मार्केटिंगला मोठा वाव असल्याचेही नमूद केले. अभिजित पाटील यांनी साखर निर्यात धोरण, त्यातील अडचणी आणि केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबत प्रश्‍न उपस्थित करून सहकार्य करण्याचे नमूद केले. या बैठकीत कन्हैया कपाडेकर, रोहन गाला, अमितकुमार जैन, संतोष भंडारी, अनिल कांबळे, सुनैना शर्मा, मयुर जाधव, परिमल भंडारी, राजेश गोसकी, श्‍याम चंडक, अक्षय बबनगरे, लक्ष्मीकांत तापडिया, तेजस भोसले, चैतन्य पाठक, प्रितम पवार, विजय पाटील, मनीषा झा, सुरेश चिकली यांनी सहभाग घेतला. प्रशांत सेठ यांनी आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Someone interacted with experts in the field of agriculture through Zoom