गुटखा पकडताच त्यांनी धरली पोलिसाची कॉलर 

प्रमोद बोडके
Thursday, 22 October 2020

या फिर्यादीनुसार मल्लिनाथ कृष्णा कटरे (वय 63, रा. वारद चाळ), महेश मल्लिनाथ कटरे (वय 30, रा. वारद चाळ), शौकत मौलासाब अत्तार (वय 59, रा. गंगानगर, तय्यब शेख यांच्या घरी भाड्याने), आलम शौकत अत्तार (वय 24, रा. गंगानगर, तय्यब शेख यांच्या घरी भाड्याने), दऱ्याप्पा शरणाप्पा जक्‍कापुरे (वय 41, रा. भवानी पेठ, बसव नगर), सिद्धाराम उर्फ अप्पी शरणाप्पा जक्‍कापुरे (वय 30 रा. भवानी पेठ, बसव नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्यावतीने आज सोलापुरात तब्बल 4 लाख 79 हजार 602 रुपयांचा गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहेत. आमचा गुटखा का जप्त केला? आम्हाला पोलीस ठाण्यात का आणले? असे म्हणत गुटखा प्रकरणतील आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी भाऊसाहेब बाबर यांची कॉलर पकडली. बाबर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. 

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी बाबर यांनी फिर्याद दिली असून सहा जणांच्या विरोधात फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 ऑक्‍टोबर रोजी एन. जी. मिल चाळ, भवानी पेठेतील चाटला साडी सेंटरच्या समोरील बोळात घडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as he grabbed the gutkha, he grabbed the police collar