खबरदार, सार्वजनिक रस्त्यावर थुंकाल तर, होईल ....

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 22 मे 2020

रिक्षासह कोणत्याही तीन चाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे. दुचाकी वाहनाला परवानगी असेल मात्र त्यावर केवळ चालक असेल. चारचाकी वाहनांमध्ये चालकासह दोनजणांना परवानगी असणार आहे. डॉक्‍टर, कर्मचारी, परिचारीका, पॅरामेडीकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिकेची आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. सर्व प्रकारच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना आंतरराज्य वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. 

सोलापूर : शहरात संचारबंदी सुरु आहे, आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही, त्यामुळे आपल्याला वाटेल त्या ठिकाणी थुंकण्याचा विचार आपण करत असाल तर, त्यासाठी दंड भरण्यास तयार रहा. शहरात विविध ठिकाणी लावलेले सीसी टीव्ही कॅमेरे आणि चौका-चौकात थांबलेले पोलिस व फिरतीवर महापालिकेचे कर्मचारी आपल्याला जागेवर दंड करून रक्कम वसूल करू शकतात. 

साथ रोग आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रापुरते आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरता घ्यावयाची दक्षता, मालवाहतूक, प्रवासी वाहतूक शहरातील व्यवसाय, दुकाने यांच्या वेळा. दुकान सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना. कामाच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी याबाबत सूचना नियोजन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या कालावधीत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, रुग्ण,गंभीर आजार असलेल्या रुग्ण व्यक्ती, गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षांखालील मुलांनी घरीच राहणे आवश्‍यक आहे. 

 

आयुक्तांनी केले आहे असे नियोजन... 
 दुकानदारांनी घ्यावयाची दक्षता 
- दुकानदार व कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रातील असू नये 
- दुकानदारांनी कामगारांना छायाचित्रासह ओळखपत्र द्यावे 
- दुकानात काम करणाऱ्या सर्वांनी हातमोजे व मास्क वापरणे आवश्‍यक 
- खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही मास्क घालण्यासाठी आग्रह धरावा 
- दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असेल असे नियोजन करावे 

 सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची दक्षता 
- सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक 
- पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास बंदी 
- अंत्यसंस्काराच्यावेळी 20 लोक उपस्थित राहण्याची मर्यादा 
- सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडनीय अपराध मानला जाईल 
- पान, तंबाखू व मद्याचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करता येणार नाही 

कामाच्या ठिकाणी घ्यायची दक्षता 
- कामाच्या ठिकाणी सर्वांनी मास्क घालणे आवश्‍यक आहे. 
- कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांत सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी 
- कामावर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या शरीराच्या तापमानाचे थर्मल स्क्रिनींग 
- कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर व हॅन्ड वॉश उपलब्ध करावेत 
- आरोग्य सेतू ऍप सर्व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करावे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spit on public roads, there will be action by police or smc officer