चारा छावणीच्या धर्तीवर राज्यात कोरोना क्वारंटाईन व मदत केंद्रे सुरू करा 

Start Corona Quarantine and Relief Centers in the state on the lines of fodder camps
Start Corona Quarantine and Relief Centers in the state on the lines of fodder camps

सांगोला (जि. सोलापूर) : सध्या कोरोना बचाव मोहीम ही केवळ प्रशासकीय मोहीम झाली आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि इतर घटकांचा सहभाग नाही. त्यामुळे कोरोनाची समस्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. यादृष्टीने कोरोना विरोधी मोहीम अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या माध्यमातून जागोजागी कोरोना क्वारंटाईन व मदत केंद्र सुरू करण्याची एक विशेष मागणी शासनाकडे केली आहे. 
यामुळे प्रशासनाचा फार मोठा भार कमी होऊन रुग्णांची तसेच नागरिकांची फार मोठी व्यवस्था होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि हे संकट हाताळण्यासाठी यामुळे खूप मोठी मदत होणार आहे. जागोजागच्या क्वारंटाईन व मदत केंद्रामुळे स्वतंत्र यंत्रणा उभारली गेल्यास भवितव्यातील फार मोठा धोका कमी होणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. सुरुवातीला सांगोला तालुक्‍यांमध्ये ही योजना पथदर्शक तत्वावर राबवण्याचा आग्रह प्रफुल्ल कदम यांनी शासनाकडे केला आहे. सांगोला तालुक्‍यात सांगोला शहर व 76 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 3 लाख 7 हजार 418 एवढी लोकसंख्या आणि 58 हजार 401 एवढी कुटुंबे आहेत. या उलट तालुक्‍यात मात्र 6 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 39 उपकेंद्र यामध्ये केवळ 11 डॉक्‍टर, 14 आरोग्य सहाय्यक, 76 आरोग्य सेवक आणि 6 औषध निर्माण अधिकारी अशी एकूण केवळ 101 एवढेच लोक कार्यरत आहेत. एवढ्या कमी मनुष्यबळावर आणि एवढ्या कमी यंत्रणेवर प्रत्येक तालुक्‍यामध्ये वाढत चाललेले कोरोना संकट कसे हाताळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासाठी जागोजागी चारा छावणीच्या धर्तीवर कोरोना क्वारंटाईन व मदत केंद्र उभारणे गरजेचे असून त्यासाठीचा एक कच्चा मसुदाही शासनाला सादर केल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com