सोलापुरातील मद्य विक्री सुरू करण्यास  पालकमंत्री भरणे यांचा होकार, प्रशासन काढणार आदेश 

bharne mama
bharne mama
Updated on

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या संचारबंदी, लॉकडाउन कालावधीत मद्य विक्री बंद करण्यात आली होती. राज्याच्या अन्य जिल्ह्यातील मद्य विक्री सुरू झाली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील मद्य विक्री केव्हा सुरू होणार? याबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात होता. राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच सोलापूर शहर व जिल्ह्यातील मद्य विक्री सुरू करण्यास सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी होकार दर्शविला आहे. 

सोलापूरचे पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूर शहर व जिल्ह्यातील मद्य विक्रीचा निर्णय जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक हे सर्वजण घेतील. राज्यातील अन्य जिल्ह्यांत ज्या पद्धतीने मद्य विक्री केली जात आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडेही मद्य विक्री सुरू होणार आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

pandharpur aashadhi wari
Police officer taking bribe near police station
pistol in crime
solapur city
Marathi News Esakal
www.esakal.com