अवश्‍य वाचा! लॉकडाउनमध्ये मुलांचा भन्नाट शोध; भविष्यात शेतकऱ्यांचा वाचणार वेळ आणि पैसा (Video)

अशोक मुरुमकर
Monday, 8 June 2020

आडचण हे विकासाचे द्‌वार असते, असं आपण अनेकदा आपण ऐकलं असेल. याचा प्रत्यय करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) येथे आला आहे. अडीच महिन्यापासून देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. यामध्ये अनेक कामे ठप्प झाली. शेतीच्या कामांना यातून सुट दिली पण, शेतात तयार होणार सर्व शेतमाल विकता आला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरात तसाच शेतमाल पडून आहे. असाच शेतमाल (मका) शेटफळ येथील साहेबराव पोळ यांच्या घरी होता.

सोलापूर : आडचण हे विकासाचे द्‌वार असते, असं आपण अनेकदा आपण ऐकलं असेल. याचा प्रत्यय करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) येथे आला आहे. अडीच महिन्यापासून देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. यामध्ये अनेक कामे ठप्प झाली. शेतीच्या कामांना यातून सुट दिली पण, शेतात तयार होणार सर्व शेतमाल विकता आला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरात तसाच शेतमाल पडून आहे. असाच शेतमाल (मका) शेटफळ येथील साहेबराव पोळ यांच्या घरी होता.
विकता न आल्याने त्याचे काय करायचे असा प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला. मकाची कणस सोलायची तर त्याला पुन्हा पैसे लागणार होते. मुलांनी त्यावर प्रयोग केला आणि सायकलीचा वापर करुन सर्व मका सोलून टाकली.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
साहेबराव पोळ यांनी जानेवारीत एक एकर स्वीट कॉर्न मका केली. एप्रिलमध्ये ती विकण्यासाठी आली. ही मका खास हुरडा (भाजून) म्हणून खाण्यासाठी वापरली जाते. मात्र, नेमका त्याचवेळी कोराना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु झाला. शेतातील मका काढण्यासाठी झालेला खर्च सुद्धा निघाला नाही. खर्च निघावा म्हणून ते थोडी- थोडी मका विकत होते. मात्र तरीही मका शिल्क राहीली. ही मका हिरवी असतानाच विकणे आवश्‍यक होते. मात्र लॉकडाऊनमुळे विकता आली नाही. त्यामुळे मकाची कणस काडून तशीच त्यांनी घरात आणून टाकली. मशीनने मका करायची तर त्याचा खर्च वाढला असता. हा खर्च नको म्हणून तशीच मका सोडून दिली होती. दरम्यान मुलांच्या शाळाही बंद झाल्या. त्यामुळे त्यांनाही काहीच काम नव्हती. इतर सुट्ट्यात मुलं क्रिकेट, गोट्या, विट्टी दांडू खेळतात. मात्र यावेळी खेड्यात सुद्धा तसं वातावरण नव्हतं, मुलं घरीच बसून होती. त्यातून त्यांनी घरीच खेळत सायकलवर मका सोलण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला असून खेळतखेळत त्यांनी मका सोलली आहे.

साहेबराव पोळ म्हणाले, खास हुरडा खाण्यासाठी म्हणून वापरण्यात येणारी स्वीटकार्न मका शेतात केली होती. ही मका एफ्रिलमध्ये विक्रीसाठी आली. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरु होता. अशा स्थितीत बाहेर कोठे मका नेता आली नाही. म्हणून जवळच्याच गावात फिरुन विकली त्यातून ५०- ६० हजार रुपये झाले. तरी मका खूप शिल्क राहिली. ती मका सोलण्यासाठी किमान आठशे रुपये खर्च येणार होता. अशा दिवसात एवढा खर्च शेतकऱ्याला परवडाणारा नाही. कारण ही मका विकताही येणार नाही. त्याला तसा दर नाही. त्याचा बाजार समितीपर्यंत नेण्याचा खर्च वाढणार होता. त्यामुळे मका तशीच ठेऊन दिली होती. पण एक दिवस भावच्या मुलं म्हणाली, ही मका अशीही तुम्ही टाकूनच दिली आहे. तर मग आम्हाला द्या. आम्हाला जरा प्रयोग करायचा आहे. मलाही वाटलं अशीच मका तर पडून आहे. मग त्यांना द्याईला काय हरकत आहे. मग त्यांना मका दिली.

असा केला प्रयोग
मुलांनी मकाची कणस टाकली होती. तिथे सायकल लावली. एका बाजूला वीटा लावल्या तर दुसऱ्याबाजूला तेलाचे डब्बे लावले. मागच्या चाकाच्या नटाला वीटा आणि डब्बा लाऊन वर उचलले. त्यामुळे सायकलचा पायंडल मारला तरी चाक जागेवर फिरु लागले. त्यानंतर एकजण सायकलवर बसून फक्त पायंडल मारु लागला आणि दुसरी चाकाला मकाची कणसं लावू लागला. त्यामुळे मकाचे दाणे निघू लागले. त्यातून एक- दीड तासात सुमारे एक क्विंटल मका निघू लागली. यातून वेळ आणि पैसा वाचला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of made by children of farmers in the lockdown to make sweet corn