सोलापुरात कडक संचारबंदी ! जाणून घ्या, नियमावली, वेळ आणि संचारबंदी काय सुरु अथवा बंद राहणार

4sancharbandi.jpg
4sancharbandi.jpg
Updated on

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने शहर-जिल्ह्यात आज रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला आहे. तर दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे. ज्यांना संचारबंदीतून सुट दिली आहे, त्यांच्याकडे कोरोना टेस्ट केल्याबद्दलचे मागील 48 तासांतील प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक बाबी...

  • कोरोनाला आवर घालण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंधाची अंमलबजावणी
  • आठवड्यातील प्रत्येक शनिवारी, रविवारी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच दुकाने राहणार बंद
  • नागरिकांना रास्त कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी; पोलिसांची जागोजागी असणार नाकाबंदी
  • आज रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत शहर-जिल्ह्यात असणार संचारबंदी
  • अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, सार्वजनिक वाहतूक, उद्योगांमधील कामगारांना संचारबंदीतून सवलत
  • ज्यांना सवलत दिली आहे, त्यांच्याकडे कोरोनाची टेस्ट केल्याचे मागील 48 तासांतील प्रमाणपत्र बंधनकारक
  • दहावी-बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात कामकाजासाठी शिक्षकांना सवलत; कागदपत्र जवळ ठेवण्याची आवश्‍यकता 

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. राज्यातील टॉपटेन शहरांमध्ये सोलापूरचा समावेश असून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहराचा मृत्यूदर वाढू लागला आहे. मात्र, सोलापुकरांनी पाळलेल्या नियमांमुळे विडी घरकूल, शेळगी, हद्दवाढ भाग अशा झोपडपट्टी परिसरातील मृत्यूदर कमी झाल्याचे चित्र आहे. कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील कोरोना आता अपार्टमेंट, हौसिंग सोसायट्यांमध्ये पसरू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे. कडक संचारबंदी ही कोरोनाला रोखण्याच्या हेतूने केली जात आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत आणि ग्रामीण भागातील 25 पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे पाच हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करीत संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे नियोजन पोलिस प्रशासनाने केले आहे.

सार्वजनिक वाहनातील प्रवाशांची होणार पडताळणी
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी, रविवारी कडक संचारबंदी असणार आहे. परंतु, या काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, संबंधित वाहनांच्या चालक-वाहकांकडे कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असून त्यांनी लस टोचून घेणे अपेक्षित आहे. दुसरीकडे संबंधित वाहनांमधील प्रवाशांकडेही कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र आवश्‍यक असून विनाकारण त्यांनी प्रवास करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आज (शुक्रवारी) रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी (ता. 12) सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीची मुदत असणार आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी सात ते शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे निर्बंध लागू राहतील, असेही महापालिका आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com