ऑनलाइन प्रश्‍नपेढी तयार करुन विद्यार्थ्यांचा घेतला सराव 

संतोष सिरसट 
Friday, 4 September 2020

विद्यार्थ्यांचा कंटाळा येऊ नये यासाठी... 
मुलांना केवळ अभ्यास करून कंटाळा येऊ नये म्हणून, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या गोष्टी, मनोरंजक गोष्टी, कार्यानुभव व्हिडीओ, विविध सणांची माहिती, दिक्षा अँपद्वारे व्हिडिओ, महाराष्ट्र शासन मार्फत प्रसारित टिलीमिली वेळापत्रक, नियमित अभ्यास करणाऱ्या मुलांना व्हाट्‌सऍप ट्रॉफी, स्टिकर व ईमोजी देऊन प्रोत्साहन देण्याचे काम धुमाळ यांनी केले. 

सोलापूर ः प्रत्येक विषयाच्या प्रत्येक पाठावर प्रश्‍नपेढी तयार करून मुलांना सरावासाठी ऑनलाइन पद्धतीने देण्याचे काम बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका प्रिया धुमाळ यांनी केले. त्यांच्या वर्गात तीन-चार मुलांकडे ऍन्ड्रॉईड फोन नव्हता अशांना इतर पालकांच्या मदतीने "माझा सोबती'च्या माध्यमातून ज्यांच्याकडे मोबाईल आहे अशा मुलांची जोडी करून सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडला. जो पालकांनी सहकार्य करून यशस्वी केला. त्यातून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचा प्रवास सुरु झाला. 

पालकांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करुन वर्गानुसार, घटकानुसार, व्हिडिओ व ऑडिओ देऊन मुलांना अभ्यासक्रमाशी जोडून ठेवण्याचे काम धुमाळ यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हास्तरावर इंग्रजी या विषयावर व्हिडिओ निर्मितीसाठी त्यांची निवड करून केवळ त्यांच्या वर्गापुरते मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील गावागावातील मुलांपर्यंत ऑनलाईन टीचर म्हणून त्यांचा पोचू दिले. मुलांना रुचावेत, सहज समजावे याकरिता ऍनिमेशन व्हिडिओ निर्मिती, वेगवेगळे इफेक्‍ट, त्यावर योग्य उच्चारासहित व्हिडिओ, कॅम्पेशिया सॉफ्टवेअरचा वापर करून व्हिडिओ तयार करण्याचे काम धुमाळ यांनी केले. 

एवढे करूनही समाधान मिळत नव्हते, कारण वर्गातील पटाच्या फक्त 50 टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात होते. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्या विध्यार्थ्यांचा प्रश्‍न मनाला सतावत होता. मग अशा मुलांना प्रत्यक्ष फोन कॉल करून त्यांच्याशी पाठावर चर्चा करू करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या शंकांचे निरसन करताना वेळेचे बंधन न पाळता पालकांच्या सोयीने त्यांना मदत केली. 
करणाऱ्याच्या मदतीला देव धावून येतो त्या उक्तीप्रमाणे विजयकुमार वसंतपुरे यांनी बनविलेली स्वाध्यायमाला खूपच कामाला आली. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students practice by creating an online question paper