विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा ! प्रथम वर्षाची मार्चअखेर परीक्षा; पुढच्याही सत्र परीक्षा ऑनलाईनच

तात्या लांडगे
Tuesday, 26 January 2021

ठळक बाबी...

 • द्वितीय व अंतिम वर्षातील 26 हजार 116 विद्यार्थ्यांपैकी 662 जण राहिले गैरहजर
 • प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा मार्चअखेर होणार; ऑनलाइन परीक्षेलाच प्राधान्य
 • जून- जुलै महिन्यात प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांची होईल एकत्रित परीक्षा
 • ऑक्‍टोबर- नोव्हेंबर 2021 मध्ये होणार द्वितीय सत्राची परीक्षा; 15 दिवसांत जाहीर होणार निकाल
 • 1 ते 15 जुलैपासून सुरु होणार आगामी सत्र; राज्य सरकारच्या निर्णयानंतर महाविद्याये सुरु करण्याचा निर्णय

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची रविवारपासून (ता. 24) सुरु झाली आहे. ही परीक्षा 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून 26 हजार 116 विद्यार्थ्यांपैकी 25 हजार 456 जणांनी ऑनलाइन परीक्षा दिली. यांची परीक्षा झाल्यानंतर प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा मार्चमध्ये घेतली जाणार असून ही परीक्षाही ऑनलाईनच घेतली जाणार आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष 15 जुलैपासून सुरु करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

15 जुलैपासून सुरु होईल आगामी शैक्षणिक सत्र
विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाबद्दलची भिती दूर झाल्यावर महाविद्यालये सुरु होतील. तोवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहे. ऑनलाइन परीक्षा पार पडल्यानंतर 10- 15 दिवसांत निकाल जाहीर करु शकतो.
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सोलापूर विद्यापीठाअंतर्गत 108 महाविद्यालये असून प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षासाठी एकूण 82 हजारांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची आगामी सत्राच्या परीक्षाही ऑनलाईनच घेतल्या जातील, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. आता द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडल्यानंतर प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यानंतर मात्र, सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा एकत्रित घेऊन आगामी शैक्षणिक वर्षाची घडी बसविण्याचे नियोजन विद्यापीठाने आतापासूनच सुरु केले आहे. दुसरीकडे पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाल्यानंतरही महाविद्यालये सुरु झाली नाहीत, हे विशेष मानले जात आहे.

ठळक बाबी...

 • द्वितीय व अंतिम वर्षातील 26 हजार 116 विद्यार्थ्यांपैकी 662 जण राहिले गैरहजर
 • प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा मार्चअखेर होणार; ऑनलाइन परीक्षेलाच प्राधान्य
 • जून- जुलै महिन्यात प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांची होईल एकत्रित परीक्षा
 • ऑक्‍टोबर- नोव्हेंबर 2021 मध्ये होणार द्वितीय सत्राची परीक्षा; 15 दिवसांत जाहीर होणार निकाल
 • 1 ते 15 जुलैपासून सुरु होणार आगामी सत्र; राज्य सरकारच्या निर्णयानंतर महाविद्याये सुरु करण्याचा निर्णय

  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Students prepare for study! At the march end of the examination will be held; The university also plans to conduct the upcoming exams online