
देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एम.एच. सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. पीसीएम विभागातून कोमल व्हनमाने, प्राची भोसले, श्रीराम लोंढे, अनिषा तापडिया, अर्पिता मस्के, श्रुती नागटिळक, स्नेहल गोखले, वैष्णवी कटकधोंड, गोविंद शिंदे, आदित्य तोटद या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे संचलित देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमाणी, सचिव आनंद भंडारी, सहसचिव मधुसुदन करवा, प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या सौ. हरदिप बोमरा यांनी अभिनंदन केले.
सोलापूर : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रामांच्या प्रवेशांसाठी झालेल्या एमएचटी-सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेत सोलापूर शहर व परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यावर्षी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती.
एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर महाविद्यायामधून ऐश्वर्या गवंडी 99.91 प्रथम तर वेदांत माढे 99.66 द्वितीय आला आहे. सीईटी सेलकडून पीसीएम व पीसीबी गटाच्या 100 पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी, प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य, उपप्राचार्य आनंद हुली, लॉजिक इन्स्टिट्यूटचे सुशांत माळवे, अविनाश घोडके, शिवराज बगले, प्रा. डॉ. अनिल देवकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या प्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. प्रमोद उडगिकर, प्रा. अभिजित निवर्गीकर, प्रा. विश्वजित आहेरकर, प्रा. तुकाराम साळुंके, भाषा समन्वयक प्रा. शिवराज पाटील, प्रा. विशाल जत्ती, समन्वय डॉ. गणेश मुडेगावकर, प्रा. रोहन डोंगरे, प्रा. संतोष पवार आदी उपस्थित होते.