वाढत्या हिरवाईमुळे प्रदूषण रोखण्यात यश

 The success of the decisive green publication
The success of the decisive green publication

सोलापूर : कचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व वाढत्या हिरवाईमुळे जिल्ह्यातील प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांना काही प्रमाणात रोखण्यात यश आले आहे.


सोलापूर मोठ्या लोकसंख्येचे शहर आहे. महापालिकेच्या कचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे शहरातील प्रदूषणाला आळा बसला आहे. कचरा गोळा करण्यासाठी शहरात एक हजारापेक्षा अधिक सफाई कामगार आहेत. प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जाते. इंदूर पॅटर्ननुसार एकूण चार ट्रान्स्पोर्टेशन पॉइंटद्वारे कचरा गोळा केला जातो. दिवसाकाठी अंदाजे 250 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्यापासून प्लास्टिक वेगळे केले जाते. उर्वरित जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून 70 ते 80 टन कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. सोलापूर बायो एनर्जी हा कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प आहे. वीजनिर्मितीद्वारे चार मेगावॅट वीज महावितरणला दिली जाते. प्लास्टिकचा कचरा रिसायकलिंग करणाऱ्यांना विकला जातो. 


सांडपाणी व्यवस्थापनासाठी देगाव, सोरेगाव, मजरेवाडी येथे प्रक्रिया प्रकल्प उभे केले आहेत. अनएरोबिक जीवाणूच्या उपचाराने त्यातून मिथेन गॅस वेगळा केला जातो. या वायूपासून प्रकल्पासाठी वीज उपलब्ध होते. शुद्ध झालेल्या पाण्याचे क्‍लोरिनेशन करून ते निर्जंतुक केले जाते. हे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना वापरण्यासाठी दिले जाते. या पद्धतीचा चौथा प्रकल्प देखील उभारला जाणार आहे. तसेच भूमिगत गटार योजना पूर्ण झाल्यावर हे प्रकल्प अधिक सक्षम होणार आहेत. 


चिंचोली व अक्कलकोट एमआयडीसीमध्ये उद्योजकांकडून प्रदूषण नियंत्रक योजना उभारल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 34 साखर कारखान्यांकडे अशा प्रकारच्या प्रदूषण नियंत्रक योजना आहेत. 


मुख्य तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहरात सांडपाणी प्रक्रियेसाठी 15.5 एमएलडी कचरा प्रकल्प कार्यरत आहेत. भीमा व सीना नदीच्या पाण्यातील प्रदूषणदेखील शासनाच्या विहित मर्यादेपेक्षा कमी आहे. प्रदूषणाची एकूण आकडेवारी पाहता पुण्याच्या तुलनेत प्रदूषण नियंत्रणाचा आकडा कमी करण्यात यंत्रणांना यश आले आहे. 

  • प्रदूषणाची आकडेवारी 
  • हवेतील सस्पेंडेड पार्टिकल 30 एमजी प्रती लि. 
  • नॉक्‍स वायू 35 ते 40 एमजी प्रती लि. 
  • सल्फर डायऑक्‍साईड 20 ते 30 एमजी प्रती लि. 

घनलागवड केली

शहरात एकूण 32 बागा आहेत. 12 ठिकाणी नैसर्गिक जंगल पद्धतीची घनलागवड केली आहे. 
- निशिराज कांबळे, उद्यान अधिकारी, मनपा सोलापूर 

चांगले परिणाम

शहरातील वायू व जल प्रदूषणाच्या बाबतीत सर्वच यंत्रणा व नागरिक जागरूक असल्याने त्याचे प्रदूषण नियंत्रणासाठी चांगले परिणाम पाहण्यास मिळतात. 
- प्रशांत भोसले, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग 

मालवाहतुकीसाठी हवा बायपास 
शहरात मालवाहतूक वाहनांमुळे वायू प्रदूषणाचा आकडा वाढतो. ही पूर्ण मालवाहतूक शहराबाहेरून करण्याचे नियोजन झाले तर वायुप्रदूषण कमी होण्यास उपयुक्त ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com