उपरीकरांना मोठा दिलासा ! कोरोनाची साखळी तोडण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश 

भारत नागणे 
Saturday, 26 September 2020

उपरी (ता. पंढरपूर) येथे आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चाचणी कॅम्प घेण्यात आला. यामध्ये 64 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी उपरी येथील 44 जणांसह 55 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. गादेगाव, आढीव, सोनके, सुपली, इसबावी, महाळुंग येथील नऊजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

पंढरपूर (सोलापूर) : उपरी (ता. पंढरपूर) येथे आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चाचणी कॅम्प घेण्यात आला. यामध्ये 64 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी उपरी येथील 44 जणांसह 55 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. गादेगाव, आढीव, सोनके, सुपली, इसबावी, महाळुंग येथील नऊजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

उपरी (ता. पंढरपूर) येथे तालुक्‍यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली होती. तीन महिन्यांनी पुन्हा उपरी येथे कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना चाचची करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत उपरी येथील दुकानदार, शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, शासकीय कर्मचारी अशा 44 जणांसह परिसरातील 64 लोकांची आज कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये उपरी येथील सर्वच्या सर्व 44 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यात स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. 

दरम्यान, सुपली (2), गादेगाव (2), सोनके (2), इसबावी (1), महाळुंग (1) तर आढीव (1) असे मिळून नऊजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

कॅम्प यशस्वी करण्यासाठी आरोग्यसेवक अंशुमन शिंदे, श्रीमती भगरे, गावकामगार तलाठी आर. एस. पाटील व आशा वर्कर गुरव यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success to the officers and staff at Upari in breaking the chain of Corona