सोलापूर जिल्हा दूध संघातील थकबाकी वसुलीसाठी करणार फौजदारी, दूध संघ प्रशासक सुनील शिरापूरकर : संचालक, संस्थाकडील वसुली

sunil shirapurkar
sunil shirapurkar
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघातून ज्या संचालकांनी/दूध उत्पादक संस्थांनी गाय खरेदी, पशुखाद्य व दूध ऍडव्हान्ससह इतर कारणास्तव दूध संघातून अनामत रक्कम घेतली आहे. ती रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच कायदेशीर मोहीम हाती घेतली जाणार आहे. रक्कम वसुलीसाठी वेळप्रसंगी आपण संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दूध संघाच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा पुणे विभागाचे दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिली. 

सोलापूर जिल्हा दूध संघाची आर्थिक स्थिती खालावल्याने दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच प्रत्येक तालुक्‍यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. दूध संघात सध्या कार्यरत असलेल्या विभाग प्रमुखांवर नोडल अधिकारी म्हणून एका तालुक्‍याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. दूध संकलन, दूध वितरण, थकबाकी वसुली ही अतिरिक्त कामे त्यांच्यावर सोपवली जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दूध संघाचा कारभार बिघडला असल्याने दूध संघावर प्रशासक नियुक्त झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दूध संकलनात वाढ करणे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर दूध बिल देणे, कर्मचाऱ्यांना नियमित पगार देणे या प्रमुख बाबी सुधारणांवर आपला अधिक भर राहणार असल्याचेही शिरापूरकर यांनी सांगितले. दूध पंढरीच्या पदार्थांच्या मार्केंटिंगसह दूध संघात सुधारणा करण्यासाठी तुमच्या डोक्‍यात काय कल्पना आहेत? याबाबत दूध संघाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 


  • दूध ऍडव्हान्स वसूलीसाठी दावे दाखल केलेल्या संस्था : 225 

  • दूध ऍडव्हान्सच्या दाव्यांची रक्कम : 1 कोटी 53 लाख रुपये 

  • पशुखाद्य येणे बाकी दावे दाखल केलेल्या संस्था : 216 

  • पशुखाद्य येणे बाकीच्या दाव्याची रक्कम : 78 लाख 38 हजार 

  • गाय खरेदीसाठी ऍडव्हान्सच्या वसुलीसाठी दावे दाखल केलेल्या संस्था : 132 
  • गाय खरेदी ऍडव्हान्सच्या दाव्यातील वसुलीची रक्कम : 2 कोटी 47 लाख रुपये 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

load shedding lights in solapur
Government Reassesses Maratha Reservation Protest Cases; 56 Withdrawn in Solapur
Nature's Fury Strikes Farmers: Banana Fields Destroyed Across Several Villages
Outrage in Karmala Taluka: Villagers Demand Rescue of Mentally Ill Man Kept Restrained
Marathi News Esakal
www.esakal.com