मुख्याध्यापक महामंडळाचा भाजप उमेदवार जितेंद्र पवारांना पाठिंबा 

भारत नागणे
Thursday, 19 November 2020

महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांच्या उपस्थितीत भटुंबरे येथे सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंब्याचे स्वागत केले. कालच राज्य कृती शाळा समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी कॉग्रेस उमेदवार जयंत आसगावकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर मुख्याध्यापक महामंडळाने भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला आहे. भाजप आणि कॉंग्रेस उमेदवारांना पाठिंबा वाढत असल्याने निवडणूकीतील चुरस आणखी वाढली आहे. 

पंढरपूर (सोलापूर): पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुख्याध्यापक महामंडळाने भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा देत त्यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

हेही वाचाः मंगळवेढा बाजार समितीमध्ये डाळिंबाला मिळाला 511 रुपये दर 

महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांच्या उपस्थितीत भटुंबरे येथे सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंब्याचे स्वागत केले. कालच राज्य कृती शाळा समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी कॉग्रेस उमेदवार जयंत आसगावकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर मुख्याध्यापक महामंडळाने भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला आहे. भाजप आणि कॉंग्रेस उमेदवारांना पाठिंबा वाढत असल्याने निवडणूकीतील चुरस आणखी वाढली आहे. 

हेही वाचाः मोठी ब्रेकिंग ः कार्तिक वारी यंदा नकोच ; जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांचा मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव 

यावेळी बोलताना माजी अध्यक्ष सुभाष माने म्हणाले की, सहा वर्षात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी ठोस असे कोणतेही शैक्षणिक काम केले नाही. उलट इतर कामांमध्ये त्यांनी अधिक लक्ष घातले. शिक्षकांचा त्यांनी विश्वास घात केला अशी टीकाही त्यांनी केली. भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पुणे विभागातून शिक्षकांचा पाठिंबा वाढत आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे सर्व कार्यकर्ते होम टू होम प्रचार सुरू केला आहे. शिक्षकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे जितेंद्र पवार यांचा विजय निश्‍चित आहे. 
बैठकीला तानाजी माने, विश्रांत गायकवाड, महेश सरवदे, श्रावण बिराजदार, बापूसाहेब निळ, श्री. उकरांडे, रंगसिध्द धसाडे, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे संचालक विलास वळेकर सिध्दराम खट्टे आदी उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support to BJP candidate Jitendra Pawar