कुंभारीतील गोदूताई परुळेकर वसाहतीत 100 पथकाद्वारे सर्वेक्षण 

milind shambharkar
milind shambharkar
Updated on

सोलापूर : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यासाठी 100 पथकाद्वारे वसाहतीतील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. घरपोच धान्य, मेडिकल सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

गोदूताई परुळेकर वसाहत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज झाली. या बैठकीस पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक व त्यांचे आजार तसेच आवश्‍यक माहिती प्रशासनास देऊन सहकार्य करावे. नागरिकांनी घराबाहेर न जाता घरातच सुरक्षित राहावे. प्रशासनाकडून वसाहतीत रेशन धान्य, दूध, मेडिकल सेवा आणि दोन ऍम्ब्युलन्सची येथे व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर जाऊ नये. गोदूताई परुळेकर वसाहतीसाठी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 100 विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या माध्यमातून येथील नागरिकांना सहकार्य करण्याबरोबरच शासनाच्या सूचना पोचविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आशासेविका यांच्याकडून सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. सर्वेक्षणास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी माहिती द्यावी. आजार अंगावर काढू नये, लपवून ठेवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

anti corruption buro, solapur
Solapur Crime
Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com