
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मदेवार हे पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार ठरवतील. पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडूनउ आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कार्यकर्त्यांनीही आपापसातील सर्व रुसवेफुगवे व हेवेदावे बाजूला ठेवून दिलेला उमेदवार निवडून आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. दरम्यान कार्यकर्त्यांनी भगिरथ भालकेंच्या नावाची घोषणाबाजी करताच, संतापलेल्या अजित पवार आणि जयतं पाटील यांनी घोषणाबाजी कराल तर याद राखा असा दमही भरला.
पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पंढरपुरात आले होते. येथील कराड रोडवरील श्रेयस हॉलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आज उमेदवाराच्या नावाची घोषणा होईस अशी शक्यता होती. परंतु आज उमेदवाराच्या नावाची घोषणा न करता, उमेदवारी बाबतचा निर्णय शरद पवार घेतील, असे सांगून अजित पवारांनी पंढरपुरातील राष्ट्रवादीचा उमेदवार कोण या बाबतचा सस्पेन्स अजूनही कायम ठेवला आहे.
यावेळी श्री. पवार म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस, शिवसेना, स्वाभीमानी, शेतकरी कामगार पक्ष अशा विविध पक्षांना विश्वासात घेवूनच उमेदवारी दिली जाणार आहे. आज येथील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. बैठकीचा सविस्तर तपशील दिल्लीत जावून शरद पवारांकडे दिला जाईल. त्यावर श्री. पवार निर्णय घेतील. उमेदवार जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या दोन तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची एक जाहीर सभा मतदार संघात होणार आहे. कार्यकर्त्यांनी आपापसातील रुसवेफुगवे आणि हेवेदावे बाजूला ठेवून उमेदवार निवडून आण्यासाठी कामाला लागावे. महाविकास आघाडी सरकारने पंढरपूर व मंगळवेढा भागातील विकास कामांसाठी निधी दिला आहे. यापुढेच्या काळात विशेषः पंढरपूरच्या विकासावर लक्ष देणार असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि नेत्यांची नाराजी
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांच्या भाषणादरम्यान समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी भगिरथ भालकेंना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. त्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवल्याने श्री. पाटल चिडले. त्यांनी आम्हाला ही थोडपार कळतं, अशी सूचक टिप्पणी केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. जयंत पाटील यांच्या भाषणानंतर अजित पवार भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी सुरवातीलाच माझ्या भाषणात कोणी घोषणा दिल्या तर याद राखा असा दम भरल. त्यामुळे कोणीही घोषणाबाजी केली नाही. परंतु अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे दोन्ही नेते काहीसे नाराज झाले.
स्वाभीमानीची सरकारविरोधात घोषणाबाजी
थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीतपंपाची वीज तोडण्याची मोहिम सुरु केली आहे. सरकारच्या सक्तीच्या वीजबील वसुलीच्या धोरणाचा विरोध करत येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. सरकारमधील मंत्र्यांना निवडणुकीच्या बैठका घेण्यासाठी वेळ आहे. परंतु शेतकरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नाही, असा आरोप करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी महाविकास आघाडीचा सरकारचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी
केली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
विठ्ठल साखर कारखान्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन का दिले म्हणून अनवली (ता. पंढरपूर) येथील किरण घोडके या
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याला काही अज्ञात कार्यकर्त्यांनी बैठकीच्या ठिकाणीच बेदम मारहाण केली. सभेच्या ठिकाणी मारमारी झाल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान राखून हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला. किरण घोडके यांनी मागील काही दिवसापूर्वी विठ्ठल कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल थेट अजित पवार आणि शरद पवारांना लेखी निवेदन दिले आहे. त्यानंतर आजही घोडके हे अजित पवारांची भेट घेण्यासाठी बैठकीच्या ठिकाणी आले असता, त्यांना इतर कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. विठ्ठल कारखान्याच्या विरोधात शरद पवारांकडे तक्रार केली म्हणून मला भगिरथ भालकेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप किरण घोडके यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.