प्रथम वर्ष इंजिनिअरिंग कॅप राउंड-1 अलॉटमेंटमध्ये पंढरपूरचे "स्वेरी' प्रथम ! दुसऱ्या क्रमांकावर सोलापूरचे "वालचंद' 

अभय जोशी 
Saturday, 16 January 2021

शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट 13 जानेवारी रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरने सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट 13 जानेवारी रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरने सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेतली असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा स्वेरीच्या "पंढरपूर पॅटर्न'ला सर्वाधिक पसंती दिली आहे, असे दिसून येते. 

सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील जागा वाटप पुढीलप्रमाणे... 

 • स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर : 446 
 • वालचंद कॉलेज, सोलापूर : 323 
 • ऑर्किड कॉलेज, सोलापूर : 261 
 • सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी : 259 
 • एन. बी. नवले सिंहगड, केगाव : 146 
 • बी. एम. आय. टी., तिऱ्हे : 137 
 • कर्मयोगी अभियांत्रिकी, शेळवे : 95 
 • ए. जी. पाटील, सोरेगाव : 67 
 • एम. आय. टी. रेल्वे इंजिनिअरिंग, बार्शी : 67 
 • बी. आय. टी., बार्शी : 55 
 • सिद्धेश्वर महिला अभियांत्रिकी, सोलापूर : 53 
 • भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज, सोलापूर : 49 
 • फॅबटेक, सांगोला : 44 
 • व्ही. व्ही. पी., सोलापूर : 30 

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीची ऑनलाइन प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज एकूण 14 महाविद्यालये आहेत. त्यातील काही महाविद्यालये "बाटू'कडे तर काही सोलापूर विद्यापीठाअंतर्गत कार्यरत आहेत. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगची आणखी एक फेरी राहिली असून, दुसरी फेरी येत्या 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये अद्याप सुरू नाहीत. ती लवकरच पूर्ववतपणे सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

बऱ्याच विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॅप राउंडमध्ये स्वेरी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच काही विद्यार्थ्यांना प्रथम फेरीमध्ये सीट अलॉट झाले नाही, तरी त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. दुसऱ्या कॅप राउंडमध्ये सर्व जागा खुल्या होणार असल्याने सीट न मिळालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे तसेच एखाद्या विद्यार्थ्याने प्रथम प्रवेश फेरीमध्ये मिळालेला प्रवेश "नॉट फ्रीझ' करून द्वितीय प्रवेश फेरीमध्ये विचारपूर्वक ऑप्शन भरले तर त्याला आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, असे प्रतिपादन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. 

विद्यार्थी व पालकांनी यंदा देखील नेहमीप्रमाणे स्वेरीच्या शिक्षण पद्धतीवर विश्वास दर्शविला असून आम्ही त्या विश्वासाला पात्र राहून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीला प्रथम प्राधान्य देऊ. 
- डॉ. बी. पी. रोंगे, 
संस्थापक - सचिव व प्राचार्य, स्वेरी, पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweri College of Pandharpur first in first year engineering cap round allotment