esakal | स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या ! शहरात 265 संशयितांमध्ये 20 पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

1Corona_93_0.jpg

ठळक बाबी... 

  • शहरातील रुग्णसंख्या आता 11 हजार 314 झाली 
  • दहा हजार 387 रुग्णांनी केली कोरोनावर मात; 326 रूग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • शहरातील एकूण रुग्णांपैकी 610 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • आज 265 संशयितांमध्ये 20 पॉझिटिव्ह; कोणाचाही मृत्यू नसल्याने दिलासा 
  • माझे कुटूंब, माझी जबाबदारीअंतर्गत सर्वांनी कुटुंबाची काळजी घ्यावी 

स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या ! शहरात 265 संशयितांमध्ये 20 पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झाला नसून दुसरीकडे टेस्टिंगची संख्याही वाढलेली नाही. आज शहरातील 16 ठिकाणी 20 रुग्ण आढळले आहेत. त्यातील पाचजण आरटीपीसीआर टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळले असून उर्वरित 15 रुग्णांचे रिपोर्ट रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक बाबी... 

  • शहरातील रुग्णसंख्या आता 11 हजार 314 झाली 
  • दहा हजार 387 रुग्णांनी केली कोरोनावर मात; 326 रूग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • शहरातील एकूण रुग्णांपैकी 610 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • आज 265 संशयितांमध्ये 20 पॉझिटिव्ह; कोणाचाही मृत्यू नसल्याने दिलासा 
  • माझे कुटूंब, माझी जबाबदारीअंतर्गत सर्वांनी कुटुंबाची काळजी घ्यावी 

शहरातील इंदिरा नगर (विजयपूर रोड), पश्‍चिम मंगळवार पेठ, जिल्हा परिषद शाळेजवळ (देगाव रोड), लतादेवी नगर (कुमठा नाका), वैष्णवी सिटी (हत्तुरे वस्ती), ब्रह्मपुरी (श्रध्दा एलिगन्सी, बाळे), सोलापूर विद्यापीठाजवळ, सिल्वर स्पिन बिल्डिंग (होटगी रोड), अरविंदधाम जवळ, गणेश बिल्डर (आसरा चौक), प्रभाकर महाराज मंदिराजवळ (सम्राट चौक), अवंती नगर, टिळक चौक, भोईटे गल्ली (देगाव), आरटीओ कार्यालयाजवळ आणि धुम्मा वस्ती येथे आज नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या आटोक्‍यात येत नसल्याने सर्वांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे, प्रवासात सॅनिटायजरचा वापर करावा, हात स्वच्छ धुवावेत, नाक, तोंड, डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे, ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा जाणवणाऱ्यांनी तत्काळ दवाखान्यातून उपचार घ्यावेत, मधुमेह, हह्दयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा असलेल्यांनी दररोज तापमान मोजावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी केले आहे.