esakal | रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Take care of the skin while playing color

चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. रंगपंचमी दिवशी रंगांची उधळण करताना सावधगिरीने करावी. रासायनिक रंग खेळले तर चेहऱ्यावर पुरळ येणे, खाज येणे असे समस्या उद्‌भवू शकतात. त्यामुळे नैसर्गिक रंग खेळून रंगपंचमी साजरी करा. पाण्याची बचत होण्यासाठी कोरडे रंग खेळावेत. 
- डॉ. स्नेहल गायकवाड, होमिओपॅथिक 

रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. कोणाला कोणता रंग लावायचा, कोणाला कोणत्या रंगात बुडवायचे याची चर्चा गल्लीबोळात रंगली आहे. रंग खेळताना रंगांचा बेरंग होणार नाही, यासाठी त्वचेची काळजी सर्वांनी घ्यावी, असे मत डॉ. स्नेहल गायकवाड यांनी व्यक्त केले. 
रंगपंचमी दिवशी रंगांची उधळण करणे हा आनंदायी क्षण आहे. रंग त्वचा आणि केस यांच्याकरिता नुकसानकारक ठरू शकतात. रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांची काळजी घ्यावी. या सणादिवशी रंगांची उधळण करताना स्वत:ची आणि समोरच्याची काळजी घ्यावी. रंगपंचमीनिमित्त बाजारात मिळणाऱ्या अपायकारक रंगांतून त्वचा विकार होऊ शकतो. तसेच रासायनिक रंगातून चेहऱ्यावर पुरळ येणे, खाज उठणे, रंग खेळताना नखांत साठलेले रंग पोटात जाण्याचे प्रकार होतात. त्यामुळे रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी सण साजरा करावा. 
 

नैसर्गिक रंग खेळून रंगपंचमी साजरी करा
चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. रंगपंचमी दिवशी रंगांची उधळण करताना सावधगिरीने करावी. रासायनिक रंग खेळले तर चेहऱ्यावर पुरळ येणे, खाज येणे असे समस्या उद्‌भवू शकतात. त्यामुळे नैसर्गिक रंग खेळून रंगपंचमी साजरी करा. पाण्याची बचत होण्यासाठी कोरडे रंग खेळावेत. 
- डॉ. स्नेहल गायकवाड, होमिओपॅथिक 

बेरंग होणार नाही याची काळजी

सर्वांना रंग खेळण्यास खूप आवडते. रंग खेळताना त्वचा आणि केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारे रंगांचा बेरंग होणार नाही याची काळजी घेऊन रंग खेळावेत. 
- पूजा माने, तरुणी

रंगपंचमी होळी