असंही असतं प्रेम; प्रपोज करताना ही घ्या काळजी...

अशोक मुरुमकर
Wednesday, 12 February 2020

आयुष्यात आवडत्या व्यक्तीवर खूप प्रेम करावं मात्र,  प्रेम करताना आणि ती व्यक्त करताना काही काळजी घेण्याची गरज आहे. आपल्यापासून समोरच्या व्यक्तीला त्रास तर नाही ना होणार, याची दक्षता घेईलाच हवी. प्रपोज करताना नकार पचवण्याची सुद्धा क्षमता असायला हवी. ‘ती माझी नाही तर कोणाचीच नाही, अशी भावना मनात नसावी’.

 व्हॅलेंटाईन डे सोलापूर : ‘व्हेलेंटाइन वीक’चा आजचा दुसरा दिवस म्हणजे ‘प्रपोज डे’! प्रिय व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. मनातली भावना आवडत्या व्यक्तीपर्यंत कशी पोहचवाची यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. काहीजण तिच्या आवडीची वस्तू गिफ्ट म्हणून देऊन तर, काहीजण तिला एकांतात भेटण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी बोलून भावना व्यक्त करतात. खरंतर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची गरज नसतेच. मात्र अनेकजण विशेषत: काही महाविद्यालयीन तरुणाई या दिवसाची आतुरतेने वाट पाहते. आणि यानिमित्ताने मनातील भावनांना वाट करुन देते.
आयुष्यात आवडत्या व्यक्तीवर खूप प्रेम करावं मात्र,  प्रेम करताना आणि ती व्यक्त करताना काही काळजी घेण्याची गरज आहे. आपल्यापासून समोरच्या व्यक्तीला त्रास तर नाही ना होणार, याची दक्षता घेईलाच हवी. प्रपोज करताना नकार पचवण्याची सुद्धा क्षमता असायला हवी. ‘ती माझी नाही तर कोणाचीच नाही, अशी भावना मनात नसावी’. प्रेम या अडीच अक्षरात मोठी ताकद आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे अंकुर कोठेना कोठे फुटतातच. नकार पचवण्याची आणि व्यक्त न होण्याची ज्याच्यात ताकद नाही त्याचा त्रास इतरांना होता. आपल्या प्रेमाने त्रास न होता समोरची व्यक्ती आनंदीत राहणे आवश्‍यक आहे. अशाच काही व्यक्ती आहेत त्यांनी नकारातून तीचा होकार मिळवला. आणि काही व्यक्ती अशा आहेत की त्या वेळेत कधी व्यक्तच झाल्या नाहीत. काहींना तर अनपेक्षीतपण तिनेच त्याला प्रपोज केलं.

२००७ ची गोष्ट. संकेत १० वी पास होऊन तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजमध्ये आला. त्याचं दररोजचं एसटीने जाणं- येणं सुरु झालं. एकाच एसटीने रोजच्याच येण्या- जाण्यामुळे त्याच्या नजरेत एक मुलगी पडली. आपण खेड्यातलो ती शहरातली. ती आवडते खूप, पण होकार मिळेल का? आपलं राहणीमान, आपलं बोलण, याची जाण त्याला होती. आणि उगीचच मनात न्युनगंड निर्माण करुन घेऊ लागला. असं करत दिवळीची सुट्टी झाली. आता त्याला तिला पाहिल्याशीवाय राहवत नव्हतं. दिवाळीच्या सु्ट्टीतही तीला पाहता यावे म्हणून तो तिच्या घराचा शोध घेऊ लागला. आणि तिचे घरही त्याला सापडले. गावापासून पाच किलोमिटरवर तिला खास पाहण्यासाठी तो सायकलवर जात. मात्र तेवढ्यातूनही ती काही कामानिमित्तच बाहेर येत. अनेकदा जाऊनही भेट होईना म्हणून निमित्त करुन तो तिच्या घरी गेला. मात्र, तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. पुढे कॉलेज सुरु झाले. जानेवरी संपला तोच फेब्रुवारी सुरु झाला. आणि त्याला असंच कोणाकडून तरी व्हेलेंडाईन डे वीकची माहिती मिळाली. मनात ठरवून आज आपल्याला व्यक्त होईच आहे, असं म्हणाशी ठरवून त्याने प्लॅनिंग केलं. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिलाही हा आपल्याकडे पाहत असल्याचे जाणवलं होतं. मात्र तिच्या कोणत्याही प्रतिसादाशीवाय संकेतने तिला प्रपोज केलं. अन्‌ अनपेक्षीतपणे त्याला तिच्याकडून नकार आला. त्यावर तो अजिभात खचला नाही. सर्व मित्रांमध्ये आपल्याला काय म्हणतील असं थोडही त्याला वाटलं नाही. आपण कोठे कमी पडलोत याची कारण त्याने शोधली. नकार असताना सुद्धा तिच्यावर असलेलं प्रेम त्याने थोडही कमी केलं नाही. एकतर्फी प्रेमातून त्याने महाविद्यलयीन शिक्षण पुर्ण केलं. त्यात गुणवत्तेतही तो मागे राहिला नाही, अन्‌ तिच्या शिक्षणातही त्याने त्याचा परिणाम होऊ दिला नाही. आजही तो म्हणतोय मी तिच्यावर खरं प्रेम करतो, ती ज्याची असेल त्याच्यापशी सुखी राहवी, हीच माजी कायम इच्छ आहे. सध्या तो पुण्यात नोकरीला आहे. आपला त्रास तिला होणार असेल तर ते प्रेम कसलं असा प्रश्‍न त्याने कला आहे.

आता ही गाष्ट आहे आशाची. प्रेम आंधळ असतं असे अनेकजण म्हणतात. मात्र, त्याचा प्रत्यय आशाला आला.  २०१० ला आशाने १८ व्या वर्षात पदार्पण केले. अभ्यासात हुशार असलेल्या आशाला इतर काही मुलींप्रमाणेच तिलाही एकजण आवडू लागला. तो कोण आहे, त्याच प्रेम आपल्यावर असेल का? याचा विचार न करता ती त्याच्यावर प्रेम करत होती. अनेकदा असं म्हटलं जात की, मुली प्रेम व्यक्त करत नाहीत. मात्र, ती त्याला अपवाद होती. एका गरीब घरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणावर ती प्रेम करत होती. एखाद्या सिनेमाला शोभणारी ही काहणी या दोघांमध्ये होती. तिच्याकडं कधीही न पाहणाऱ्या मुलाला तिने प्रपोज केलं. मात्र, त्याचा तिच्यावर विश्‍वासच बसेना. यासाठी दोघांना व्हेलेंटाईन डेची वाट पाहवी लागली. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत ज्याप्रमाणे यशला जुई सांगते इनामदार हे माझेच वडील आहेत, मात्र त्यावर त्याचा विश्‍वासच बसत नव्हता. अगदी त्याचप्रमाणे आशाच्या प्रेमावर त्याचा विश्‍वास नव्हता. त्याला कारण ती मोठ्या घरातली अन्‌ आपण... पैसे, संपत्ती याला पाहून प्रेम केलं जात नाही. हे यातून आशाने सिद्ध करुन दाखवलं. व्हेलेटाईन डे दिवशीच आशानेच त्याला प्रपोज केला. आणि दोघानीही एकमेकाबद्दलच्ंया भावनांना वाट करुन दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care when proposing