esakal | स्वत:च्या जबाबदारीवर द्या टायपिंग अन्‌ शॉर्टहॅण्डची परीक्षा 

बोलून बातमी शोधा

Typing}

विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर द्यावी परीक्षा 
कोरोना वाढत असल्याने आता बाजार समित्यांमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही तपासणी करून बाजार समितीत प्रवेश दिला जात आहे. हॉटेल, दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती थांबू नयेत, तीनचाकी वाहनात तीन तर चारचाकी वाहनात चालकासह चार व्यक्‍तीच असाव्यात, असेही आदेश स्थानिक प्रशासनाने काढले आहेत. मात्र, टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा देताना त्या केंद्रांवर या नियमांचे पालन तंतोतंत होईल का, सर्वच केंद्रचालकांकडे थर्मल गन आहेत का, याची पडताळणी शिक्षण परिषदेने केलेली नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा द्यावी, असेही शिक्षण परिषदेने म्हटले आहे. 

स्वत:च्या जबाबदारीवर द्या टायपिंग अन्‌ शॉर्टहॅण्डची परीक्षा 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर, ता. 1 : राज्यातील 17 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पालक-विद्यार्थ्यांची चिंता पुन्हा वाढल्याने शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली आहेत. तरीही, शिक्षण परिषदेने टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा उद्यापासून (ता. 2) घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षा 21 दिवस चालणार असून परीक्षेसाठी एक लाख 16 हजार विद्यार्थी बसले आहेत. राज्यातील 250 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा देताना त्या केंद्रांवर या नियमांचे पालन तंतोतंत होईल का, सर्वच केंद्रचालकांकडे थर्मल गन आहेत का, याची पडताळणी शिक्षण परिषदेने केलेली नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा द्यावी, असेही शिक्षण परिषदेने म्हटले आहे. 

शासकीय अथवा खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर आहेत. दरवर्षी दीड लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतात. एक तासाचा एक पेपर असतो, तर मराठी, इंग्रजी आणि हिंदी या विषयातून ही परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे यंदा परीक्षा लांबणीवर पडली होती. मात्र, कोरोनाचे संकट कधीपर्यंत हद्दपार होईल, हे सांगणे कठीण असल्याने शिक्षण परिषदेने या विद्यार्थ्यांची परीक्षा उरकण्याचे नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्क्रिनिंग असणे बंधनकारक आहे, अशा सूचना शिक्षण परिषदेने दिल्या आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन त्याठिकाणी होईल का, याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी एक तास उपस्थित रहावे, असेही कळविण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर द्यावी परीक्षा 
कोरोना वाढत असल्याने आता बाजार समित्यांमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही तपासणी करून बाजार समितीत प्रवेश दिला जात आहे. हॉटेल, दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती थांबू नयेत, तीनचाकी वाहनात तीन तर चारचाकी वाहनात चालकासह चार व्यक्‍तीच असाव्यात, असेही आदेश स्थानिक प्रशासनाने काढले आहेत. मात्र, टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा देताना त्या केंद्रांवर या नियमांचे पालन तंतोतंत होईल का, सर्वच केंद्रचालकांकडे थर्मल गन आहेत का, याची पडताळणी शिक्षण परिषदेने केलेली नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा द्यावी, असेही शिक्षण परिषदेने म्हटले आहे. 

टायपिंग आणि शॉर्टहॅण्डची परीक्षा 2 मार्चपासून पुढे 21 दिवस घेण्याचे वेळापत्रक निश्‍चित झाले असून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरीत केली आहेत. औरंगाबाद वगळता राज्यात परीक्षा घेण्याचे नियोजन होते, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल. 
- तुकाराम सुपे, आयुक्‍त, शिक्षण परिषद, पुणे 

संपादन : अरविंद मोटे