TARGET : `या` महापालिकेसमोर 28 दिवसांत 283 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट

TARGET : `या` महापालिकेसमोर 28 दिवसांत 283 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट
Updated on

सोलापूर : आर्थिक वर्ष संपायला फक्त 28 दिवस उरले आहेत. या कालावधीत तब्बल 283 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनासमोर आहे. या आर्थिक वर्षासाठी 447 कोटी 72 लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते, फेब्रुवारी 2020अखेर फक्त 164 कोटी 57 लाख रुपयांची वसुली झाली आहे. 

महापालिकेला एकूण 17 विभागांमार्फत महसूल मिळतो. त्यात सर्वाधिक वाटा हा कर आकारणी विभागाचा आहे. शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिल्यामुळे मिळकत कर वसुलीचे प्रमाण वाढले असले तरी, इतर विभागांकडून मात्र समाधानकारक वसुली झालेली नाही. त्यामुळेच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतेवेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शहरातील गाळ्यांच्या भाड्याबाबतचे धोरण शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे गाळ्यापासून मिळणारे अपेक्षित उत्पन्नही महापालिकेस मिळेनासे झाले आहे. याशिवाय मंडई विभागाकडूनही अपेक्षित वसुली झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी आता उर्वरित 28 दिवसांत 283 कोटींपैकी किती वसुली करणे महापालिकेस शक्‍य होते हे महिनाअखेरच स्पष्ट होणार आहे. 

फेब्रुवारीअखेर मिळालेले खातेनिहाय उत्पन्न रुपयांत : स्थानिक संस्था कर (20.55 लाख), कर आकारणी (65.32 कोटी), गलिच्छ वस्ती सुधारणा (दोन कोटी 86 लाख), हद्दवाढ (55 कोटी 39 लाख), भूमी व मालमत्ता (तीन कोटी 84 लाख), मंडई (एक कोटी), उद्यान (आठ लाख 78 हजार), सार्वजनिक आरोग्य अभियंता (एक कोटी 49 लाख), नगरअभियंता (29 कोटी 38 लाख), आरोग्य (65 लाख 50 हजार), विभागीय कार्यालय (35 लाख 61 हजार), सामान्य प्रशासन विभाग (17 लाख 32 हजार), स्मृती मंदिर (63 लाख 79 हजार), क्रीडा (31 लाख 21 हजार), विधान सल्लागार (तीन लाख सहा हजार), अभिलेखापाल (40 लाख 81 हजार), इतर (दोन कोटी 38 लाख). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Phaltan Pandharpur railway project land acquisition
Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra
Aherwadi Crime News Young Man Sachin Killed At 24 Over Alleged Illicit Relationship Suspicion Relatives Face Murder Case
Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees
Marathi News Esakal
www.esakal.com