शिक्षकांचा महापालिकेत मोर्चा ! दिवाळीसाठी सर्व्हेतून सुट्टी द्या 

तात्या लांडगे
Saturday, 7 November 2020

शिक्षक महापौरांना म्हणाले... 

 • एप्रिलपासून शिक्षकांना दिली जातेय कोरोना ड्यूटी 
 • शहरातील साडेतीन हजार शिक्षक करताहेत शहरात सर्व्हेचे काम 
 • एकाच शिक्षकाला दोन- तीनवेळा आली आतापर्यंत ड्यूटी 
 • सर्व्हेशिवाय अन्य कामेही संबंधित वैद्यकीय अधिकारी सांगू लागले आहेत 
 • दिवाळीनिमित्त शिक्षकांना कोरोना ड्यूटीतून कार्यमुक्‍त करावे 
 • 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याने नववी- दहावीच्या अभ्यासक्रमाची तयारी करायची आहे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करणे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्व्हे करण्यासाठी शहरातील शिक्षकांना कोरोना एप्रिलपासून कोरोना ड्युटी देण्यात आली आहे. काहींना तीन- तीनवेळा ड्युटी आली असून त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम केले. आता दिवाळीनिमित्ताने शिक्षकांना काही दिवसांची सुट्टी द्यावी, त्यांना कोरोना ड्युटीतून मुक्‍त करावे, अशी मागणी दयानंद आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे केली. आज (शनिवारी) शिक्षक कोरोना ड्युटी करून त्यांनी थेट महापालिकाच गाठली. त्यावेळी आयुक्‍तांसमवेत चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले. 

 

शिक्षक महापौरांना म्हणाले... 

 • एप्रिलपासून शिक्षकांना दिली जातेय कोरोना ड्यूटी 
 • शहरातील साडेतीन हजार शिक्षक करताहेत शहरात सर्व्हेचे काम 
 • एकाच शिक्षकाला दोन- तीनवेळा आली आतापर्यंत ड्यूटी 
 • सर्व्हेशिवाय अन्य कामेही संबंधित वैद्यकीय अधिकारी सांगू लागले आहेत 
 • दिवाळीनिमित्त शिक्षकांना कोरोना ड्यूटीतून कार्यमुक्‍त करावे 
 • 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याने नववी- दहावीच्या अभ्यासक्रमाची तयारी करायची आहे

 

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी शहरातील शिक्षक- शिक्षकांची ड्यूटी कोरोनासाठी वर्ग केली आहे. शिक्षकांनी आतापर्यंत केलेल्या कामांमुळेच शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. यापुढेही शिक्षक गरज पडल्यास निश्‍चितपणे कोरोना ड्यूटी करतील, परंतु दिवाळीनिमित्त काही दिवसांची सुट्टी द्यावी, अशी मागणी यावेळी महापौरांकडे करण्यात आली. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविल्याने शिक्षकांना कार्यमुक्‍त करता येणार नाही. त्याबाबत राज्य स्तरावरुन निर्णय व्हायला हवा, अशी भूमिका महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे घेऊन चर्चा केली. त्यांनी शिक्षकांना कार्यमुक्‍त करण्याबाबत तथा दिवाळीनिमित्त सुट्टी देण्याचा निर्णय आयुक्‍त घेतील, असेही त्यांनी शिक्षकांना सांगितले. शिक्षकांच्या मागणीवर अद्याप तोडगा निघाला नसून जितेंद्र पवार यांनी याबाबत तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी महापौरांकडे केली. दरम्यान, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सरकारकडे बोट दाखविल्याने शिक्षकांना दिवाळीनिमित्त सुट्टी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Teachers march in solapur Municipal Corporation! Take a break from the survey for Diwali