तंत्रस्नेही शिक्षक राबताहेत वेगवेगळे उपक्रम

Technology friendly teachers are doing various activities
Technology friendly teachers are doing various activities

सोलापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे सगळीकडे लोक डाऊन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद आहेत तरीही जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्या इनोवेटिव च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांना अध्यापनाचे काम सुरू ठेवले आहे. त्याचा "सकाळ'ने घेतलेला हा आढावा.... 


व्हेरियस आर्ट क्‍लब 
विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या कलागुणांना बाहेर काढून त्याचा उपयोग शाळेची हजेरी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हेरियस आर्ट क्‍लब स्थापन केला. याच्यामध्ये हस्तकला, नृत्य, अभिनय, क्रीडा अशा वेगळ्या स्पर्धा पंधरा दिवसात राबवल्या आणि सर्वांना प्रमाणपत्र दिला. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी वाटू लागली. त्याचबरोबर मोबाईलचे दुष्परिणाम लक्षात यावे यासाठी Mime act युट्युब चॅनलवर माहिती देण्यात आली. या सर्व गोष्टींमुळे शाळेबद्दल आपुलकी व गुणवत्तासुद्धा वाढली. 
- मेहमूद नवाज अब्दुल मजीद जागीरदार, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, सलगर ता. अक्कलकोट. 

दप्तर विना एक दिवस शाळा 
या उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तर विना शाळेत येण्यास सांगितले. विविध गप्पा-गोष्टी, गाणे, मुलाखती, संगीत, खेळ, कृतीयुक्त गीते त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलून त्यांचे मार्गदर्शन आदी गोष्टी करण्यात आल्या. ज्यामुळे त्या एका दिवशी मुलांना विना दप्तर घेऊन देखील अभ्यास करता येतो हे लक्षात आले. विविध क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार, यशोगाथा, त्याचबरोबर आठवडी बाजार भरवणे, संगीत कार्यक्रम, बॅंक पोस्ट ग्रामपंचायत गाव आदी क्षेत्रभेटी करण्यात आल्या. ज्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागला. 
- शरणाप्पा फुलारी, जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा, नागणसूर, ता. अक्कलकोट 

अबोल झाली बोलती 
बालवाडी, अंगणवाडी न करता थेट पहिली प्रवेश घेतलेल्या अबोल मुलांना बोलते करणे या उपक्रमांतर्गत प्रथम विद्यार्थ्यांच्या आवडीचे कृतीयुक्त गीत, पक्षी प्राणी यांच्या मनोरंजक कथा, नकला, त्याचबरोबर मराठी हिंदी आदी भाषांच्या कथा, आपल्या रोजच्या जीवनात पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या भाषेत सांगणे यासाठी विद्यार्थ्यांचे गट सर्वांना सहभागी केले. प्रत्येक गटाला एक वेगळे चित्र आणि त्या चित्रानुसार कथा सांगणे या गोष्टी सुरू केल्या. सुरुवातीला न बोलणारी मुलं चित्र पाहून नुसतं नाव सांगू लागली. हळूहळू त्यांच्या प्रसंग रंगवू लागली. त्यांची ही उत्तरे त्यांच्याच भाषेत स्वीकारण्यास सुरुवात केल्यामुळे ही अबोल असणारी मुलं बोलू लागली आणि हीच मुलं आता वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेऊ लागली आहेत. 
- सुप्रिया पुंजाल, चतुराबाई श्राविका विद्यालय, विकास नगर, होटगी रोड, सोलापूर. 

गणिती खेळाचे दुकान 
आज तंत्रज्ञानाचे युग आहे सहाजिकच त्यामुळे प्रत्येक मुले घरामध्ये मोबाईल, कॉम्प्युटरवरती वेगवेगळे गेम खेळण्यांमध्ये मुलं दंग असतात. परंतु याच कॉम्प्युटरचा जर आपण गणितीय क्रियासाठी उपयोग करून घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. डिजिटल ज्ञानरचनावाद वर आधारित एक्‍सेल सॉफ्टवेअर तयार केले ज्याच्या मध्ये मुलांना खेळण्याचे दुकान या उपक्रमांतर्गत खेळण्यांची तुलना, खेळण्याची कमी जास्त किंमत, पैसे मिसळणे कमी करणे, एखाद्या वस्तूची किंमत एवढी जर अमुक-तमुक वस्तू घेतल्या तर किती रुपये होतील आदी गोष्टी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मुलं हसत खेळत शिकत गणिताची गोडी निर्माण झाली. हे ज्ञान त्यांना व्यवहारांमध्ये वापरण्यास उपयुक्त ठरू लागले आहे. 
- परवेज शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोसलेवस्ती, ता. मोहोळ 

पहिलीची मुलं वाचतात दहावीची पुस्तके 
शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलाला सुरुवातीपासूनच अशी तयारी केली जाते ज्यामध्ये त्याचं वाचन- लेखन, गणित, इंग्रजी याचा याची आवड निर्माण व्हावी ज्यामुळे ही मुलं पूर्णपणे तयार होतात. प्रजासत्ताक दिनी सर्व पालकांसमोर अगदी दहावी पुस्तक न अडखळता वाचन करतात आणि यामुळे इंग्रजी माध्यमातील अनेक मुलं माझ्या शाळेमध्ये गर्दी करत आहेत. छोट्या छोट्या क्‍लृप्त्यांच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याकडे लक्ष दिले जाते. 
- रवी चव्हाण, जिल्हा परिषद शाळा इंगोलेवस्ती, खंडाळी ता- मोहोळ 

अध्यापनात 4डी ऍपचा वापर 
तंत्रज्ञानाच्या साह्याने मुलांना अभ्यासाच्या बाबतीत वाटणारी मरगळ कमी केली. मोबाईलवरती निमल फोर डी, मर्ज क्‍यूब आधी ऍपच्या माध्यमातून मुलांना आभासी गोष्टी खरे भासतात. अशा उपक्रमांमुळे मुलांना अभ्यासाची आवड निर्माण झाली. आज लॉकडाऊन काळात सुद्धा मुलं घरी बसून आपली ही आवड जोपासत आहेत. नवनवीन गोष्टी शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- ज्योती पाटील, श्री. सिद्धेश्वर प्राथमिक शाळा, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com