तहसीलदार समीर माने यांनी सुरू केली करमाळ्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

Tehsildar Sameer Mane is inspecting the damaged area in Karmala.jpg
Tehsildar Sameer Mane is inspecting the damaged area in Karmala.jpg

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरे पडली आहेत. जेऊर गावातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. 10 ते 15 गाड्या वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील नुकसान झालेल्या भागाची पहाणी तहसीलदार समीर माने यांनी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू केली असून नुकसान झालेल्या सर्व भागाचे पंचनामे करण्यात येतील, अशी माहीती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.
 
करमाळा तालुक्यात बुधवारी सकाळी रिमझिम पाऊस होता. माञ दुपारी तीन वाजल्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील मांगी, वीट, राजुरी, कुंभारगाव, सावडी, कोर्टी, केम, वडशिवणे, नेरले, साडे, उमरड सालसे या भागातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. याशिवाय कुंभेज येथे दहीगांव उपसा सिंचन योजनेचा कॅनल फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतक-यांची शेती वाहिली आहे.

शेतात जागोजागी पाणी साठले असून या साठलेल्या पाण्यामुळे कांदा, ज्वारी, मका, ऊस, केळी या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेली आहेत. नुकसान झाल्यास भागाची तहसीलदार समीर माने यांनी महसुल विभागाचे मंडलाधिकारी व तलाठी यांना घेऊन पहाणी सुरू केली आहे. तहसीलदार समीर माने यांनी सकाळी साडेसात वाजता कुंभेज येथील फुटलेला दहीगांवचा कॅनाॅल, तसेच जेऊर, लव्हे, कोंढेज या गावांना भेटी दिल्या आहेत. करमाळा शहरात सर्व रस्त्यावरून पाणी वाहिले आहे. माञ कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

करमाळा तालुक्यात एका दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. आम्ही सकाळपासूनच नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करत आहोत. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे, पडलेल्या घरांचे व इतर नुकसानीचे पंचनामे तत्काळ केले जातील. लोकांनी घाबरून न जाता वादळी वाऱ्यांपासून व मुसळधार पावसापासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. 
समीर माने, तहसीलदार- करमाळा

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com