esakal | तेलुगु भगिनींचा आवडत्या ब्रतुकम्मा सणाची अख्यायिका  
sakal

बोलून बातमी शोधा

Telugu Solpaur

सोलापूरमधील पूर्व भागातील तेलुगु भगिनींचा हा ब्रतुकम्मा उत्सव सर्वत्र प्रसिध्द आहे. हा उत्सव पहाण्यासाठी शहर परिसरातील महिला मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे शुक्रवारी 23 आक्‍टोबर रोजी श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम्‌ येथे होणाऱ्या ब्रतुकम्मा महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आला आहे.

तेलुगु भगिनींचा आवडत्या ब्रतुकम्मा सणाची अख्यायिका  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूरमधील पूर्व भागातील तेलुगु भगिनींचा हा ब्रतुकम्मा उत्सव सर्वत्र प्रसिध्द आहे. हा उत्सव पहाण्यासाठी शहर परिसरातील महिला मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे शुक्रवारी 23 आक्‍टोबर रोजी श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम्‌ येथे होणाऱ्या ब्रतुकम्मा महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आला आहे. महिला भगिनींनी सुरक्षित अंतर ठेवून आपापल्या घरासमोरच ब्रतुकंम्मा सण साजरा करावा, असे आवाहन सचिव सत्यनारायण गुर्रम यांनी केला आहे. 

ब्रतुकम्मा या प्रसिध्द सणांची आख्यायिका अशी आहे. चोळ देशाचा राजा धर्मन्गड व राणी सत्यवती यांचा संसार सुखाने चाललेला होता. 
काही कालांतरांने संतान प्राप्ती झाली. हे संतान जगत नसे. कित्येक मुले जन्म घेत व लगेच मरत असत. राजा राणी खुप दु:खी असायचे. व्रतवैकल्याचाही परिणाम काही होईना. केल्या जन्मलेल्या बाळांना आयुष्य मिळेना. मूल जगण्यासाठी काय करावे? राजदरबारातील विचारवंतांना, पुरोहितांना पंडित व विद्वानांना बोलावून चर्चा करण्यात आली. 

चर्चेअंती जर या देशाच्या राजाला उत्तम संतानप्राती झाल्यास त्यादिवशी राज्यात एकही चुल पेटू नये. गाव जेवण देण्यात यावे. प्रत्येकांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. चिमुकल्या बाळास आशीर्वाद द्यावा. कालांतराने नवराञोत्सवाच्या पर्व काळात राजाला सुंदर असे कन्यारत्न प्राप्त होते. ठरल्याप्रमाणे राज्यात दवंडी पिटवुन कन्यारत्नाचे नामकरण करून हर्षोल्हासात आनंदोत्सव साजरा केला जातो. सर्व 
गावकरी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत, प्रत्येकजण पाळण्यात निजलेल्या बाळाला आशीर्वाद देऊन जातात. शेवटी पार्वती देवी एका आजीच्या रूपात काठी टेकत टेकत पाळण्याजवळ येते आणि कन्यारत्नाला "चल्लगा ब्रतुकु अम्मा' (आयुष्यवंत हो) असा आशीर्वाद पार्वती देवी त्या कन्येला देते. त्या आठवणी राहव्यात म्हणून तेलंगणा प्रांतातली महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या (येंगिली पुव्वुला ब्रतुकम्मा) ते अष्टमी (सद्दुला ब्रतुकम्मा) पर्यंत साजरा करतात. हळदीने गौरीदेवी बनवून निसर्गातील विविध रंगीबेरंगी फुले आणुन फुलांचा गोपुर बनवुन पारंपरिक लोकगीते म्हणत ज्येष्ठ महिला घरात सुख शांती ऐश्वर्य प्राप्तीसाठी, विवाहित स्त्रिया संतानप्राप्तीसाठी, कुमारी उत्तम वर मिळण्यासाठी या ब्रतुकम्मा भोवती बतुकम्मा बतुकम्मा उय्यालो (आयुष्यवंत हो, किर्तीवंत हो म्हणत अंगाई गीत गातात.) म्हणत युवती, कुमारिका फेर धरतात. 
या वर्षातून एकदा येणाऱ्या ब्रतुकम्मा सणांचे महिला, भगिनी, नवीन लग्न झालेली सासुरवाशिण कधी एकदा माहेर जाऊ अलंकाराने नटूनथटुन भरजरी शालू नेसून बतकम्मा खेळ खेळण्यासाठी वाट बघत असतात. 

सोलापुरातील पूर्व भागात प्रत्येक घराघरात ही तेलंगना संस्कृती या नवराञोत्सवाच्या अष्टमी दिनी दिसून येते. घरात सुखशांती नांदण्यासाठी भल्या पहाटेच घरासमोर सडासमांर्जन करून रांगोळी काढणे, विविध रंगाच्या फुलांनी सुंदर बतुकम्मा बनवुन गौरी देवीस नैवेद्यासाठी गुळ,शेंगा, बडिशेप, ईलायची, चपाती, फुटाणे व तुपापासून बनविलेले चविष्ट लाडू (मलिदा लाडू), पुलोहरा, दहीभात, गोड भात बनवुन खेळ संपल्यानंतर एकमेकीना प्रसाद देतात. 
या ब्रतुकम्मा सणाच्या निमित्ताने वयोवृध्द आजीपासून एक वर्षाच्या चिमुकलीचा उत्साह पाहावयास मिळतो. हळदीकुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आपुलकी, आदर, प्रेम तेलुगु संस्कृतीचे दर्शन पहावयास मिळते. 
पूर्व भागात हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करणेसाठी विविध मंडळे गेल्या काही वर्षांपासून आकर्षक ब्रतकम्मा सजावट,पारंपरिक वेशभूषा करून फेर धरून खेळ खेळण्यासाठी, लोकगीते गाण्यासाठी पारितोषिके देत असतात. 
पूर्व भागातील जुने वालचंद कॉलेज गेट समोरील श्री पंचमुखी हनुमान देवस्थान येथे दरवर्षी हजारो महिला भगिनी अष्टमीदिनी या ब्रतुकम्मा महोत्सवात सहभागी होतात. चाटला पैठणी सेंटरच्या वतीने प्रतिवर्षी प्रोत्साहन म्हणून आकर्षक नैसर्गिक फुलांनी ब्रतुकम्मा सजावटीसाठी, पारंपरिक वेषभूषा व ब्रतुकम्मा लोकगीत गायिकांसाठी विजेत्यांना पैठणी साडी भेट देतात. 

या दिवशी शहर परिसरातील विविध समाजातील महिला ही तेलुगु भगिनींचा हा ब्रतुकम्मा उत्सव पहाण्यासाठी हजेरी लावतात. 
यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे शुक्रवारी 23 आक्‍टोबर रोजी श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम्‌ येथे होणारी ब्रतुकम्मा महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आला आहे. महिला भगिनींनी सुरक्षित अंतर ठेवून आपापल्या घरासमोरच ब्रतुकंम्मा सण साजरा करावा, असे आवाहन सचिव सत्यनारायण गुर्रम यांनी केले आहे. 

संपादन : अरविंद मोटे