टेंभुर्णी- नगर महामार्गावर ट्रक व एसटीची समारोसमोर धडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

सोलापूर : टेंभुर्णी-अहमदनगर महामार्गावर पावणेबाराच्या दरम्यान अकोले (ता.माढा) येथे ट्रक आणि एसटीचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. तर एसटीमध्ये सर्व प्रवासी जखमी झाले आहेत.

टेंभुर्णी-करमाळा महामार्गावर नाशिक-सोलापूर येथे करमाळा कडून सोलापूरकडे एस.टी.बस येत होती, तर टेंभुर्णी कडून अहमदनगरकडे ट्रक जात होता. अकोले (ता.माढा) जवळ आल्यानंतर या दोन्ही वाहनांचा समोरासमोर जोरदार धडक झाली. यात एस.टी. चालकाच्या मागे असलेल्या सीटवर बसलेली तरूणी गंभीर जखमी झालेली आहे. तसेच गाडीतील अनेक प्रवाशांच्या तोंडांना मार लागलेला आहे. अपघात झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिक व तरुणांनी मदत केली. ट्रकमधील चालकाची समोरासमोर धडक झाल्याने अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकली होती, त्यामुळे मदत करण्यास अडचणी आल्या. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Tembuhni Ahmadanagar road accident of ST bus and truck