मुळेगाव पारधीवस्तीत दहा; ठोंगे उपळाईसह ग्रामीण भागात नवे 17 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

ग्रामीणमधील बाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर 
सोलापूर शहरामध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती आता ग्रामीण भागातही होऊ लागली आहे. एकट्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीच्या जवळ गेला आहे. अक्कलकोट व बार्शी तालुक्‍यात बाधित होणाऱ्यांची स्पर्धा लागली आहे. दोन्ही तालुक्‍यात आतापर्यंत 30 जण बाधित झाले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्‍यकता आहे. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. आज एकाच दिवशी तब्बल सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये मुळगेवा (ता. दक्षिण सोलापूर) येथील पारधीवस्तीतील दहा तर उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथे एक रुग्ण नव्याने आढळून आला आहे. 

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील 65 जणांचे अहवाल आज दिले आहेत. त्यामध्ये 48 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 196 इतकी झाली आहे. पारधीवस्तीमध्ये चार पुरुष व सहा स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय आज कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एक पुरुष एक स्त्री, पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील एक पुरुष, क्रांतीनगर मोहोळ येथील एक पुरुष, कसबा पेठ बार्शी येथील एक स्त्री, उपळाई ठोंगे येथील एक पुरुष, शिवाजीनगर बार्शी येथील एक स्त्री कोरोनाबाधित असल्याचे आज आलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. रुग्णालयात अद्यापही 109 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 76 इतकी आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात 11 जण दगावले आहेत. 

ग्रामीणमधील बाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर 
सोलापूर शहरामध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. त्याचीच पुनरावृत्ती आता ग्रामीण भागातही होऊ लागली आहे. एकट्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीच्या जवळ गेला आहे. अक्कलकोट व बार्शी तालुक्‍यात बाधित होणाऱ्यांची स्पर्धा लागली आहे. दोन्ही तालुक्‍यात आतापर्यंत 30 जण बाधित झाले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्‍यकता आहे. 

तालुकानिहाय बाधितांची संख्या 
अक्कलकोट-30, बार्शी-30, करमाळा-0, माढा-7, माळशिरस-4, मंगळवेढा-0, मोहोळ-10, उत्तर सोलापूर-13, पंढरपूर-7, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-91, एकूण-196. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten in Mulegaon Pardhivasti; 17 new patients in rural areas with thonge uplai