
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून या संकटाला हद्दपार करण्याच्या निमित्ताने प्रत्येकांनी मास्कचा नियमित वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम काटेकोर पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
सोलापूर : शहरात आज 768 संशयितांमध्ये 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागातील 941 संशयितांमध्ये 44 पॉझिटिव्ह असून दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 12 हजार 706 तर ग्रामीणमधील रुग्णसंख्या आता 41 हजार 20 वर पोहचली आहे. शहर-जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 859 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही ग्रामीण व शहरातील संशयितांची टेस्टिंग वाढलेले नाही, हे आश्चर्य.
उत्तर सोलापूर सावरतेय
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. आज पुन्हा या तालुक्यात एकही रुग्ण आढळला नसून सध्या 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर अक्कलकोट तालुक्यातील 20, बार्शीतील 73, करमाळ्यातील 93, माढ्यातील 99, माळशिरसमधील 123, मंगळवेढ्यातील 19, मोहोळमधील 15, पंढरपुरातील 73, सांगोल्यातील 32 तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 15 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या 54 हजारांकडे वाटचाल करीत असून संशयितांचे टेस्टिंग वाढविण्यासंदर्भात जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाने केले. जिल्ह्यात दररोज सरासरी अडीच ते तीन हजार तर शहरात दररोज एक हजार संशयितांची टेस्ट केली जाईल, असे प्रशासनाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्यानुसार कार्यवाही दिसत नाही. विशेष म्हणजे आज (सोमवारी) शहर-जिल्ह्यातील एक हजार 709 संशयितांचीच टेस्ट करण्यात आली. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढू लागल्याने सध्या सुरु असलेल्या को-मॉर्बिड रुग्णांच्या सर्व्हेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. मसलेचौधरी (ता. मोहोळ) येथील 77 वर्षीय पुरुषाचा तर बार्शीतील मनगिरे मळा येथील 52 वर्षीय महिलेचा आणि सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरातील 70 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून या संकटाला हद्दपार करण्याच्या निमित्ताने प्रत्येकांनी मास्कचा नियमित वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम काटेकोर पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
शहरात 'या' ठिकाणी आढळले रुग्ण
एसआरपी कॅम्प (सोरेगाव), कोनापुरे चाळ, सन्मती नगर, इंदिरा नगर, निर्मिती विहार, निर्मल हाईटस् (विजयपूर रोड), शिंदे चौक, मिहिर अपार्टमेंट, भवानी पेठ, क्षमा अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स्), साखर पेठ, गोल्डफिंच पेठ, गणेश सोसायटी, महेश कॉलनी (सम्राट चौक), लक्ष्मी मार्केटजवळ (दक्षिण कसबा), दत्त चौक, अवंती नगर, सिव्हील हॉस्पिटल क्वॉर्टरस्, शशिकला नगर (नई जिंदगी), गंगा नगर (भवानी पेठ), विनायक नगर, सिरत नगर, राजस्व नगर, निर्मिती विहार (भवानी पेठ), विनायक नगर, जुळे सोलापूर, शिवाजी नगर (बाळे), आदित्य नगर, आंबेडकर सोसायटी (सिव्हिल लाईन्स्), शास्त्री नगर, आसरा सोसायटी, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड) आणि दमाणी नगर येथे नवे रुग्ण आढळले आहेत.