"टीईटी'त एसईबीसी, ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के गुणांची सूट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने जानेवारी महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली होती. त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना "टीईटी' उत्तीर्ण होण्यासाठी पाच टक्के गुणांची सूट देण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे. 

परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी याबाबत आज पत्र काढून राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. या पत्रामध्ये आयुक्त सुपे म्हणतात, "टीईटी' परीक्षा अर्ज भरताना संबंधित जात प्रवर्गाची (एसईबीसी, ईडब्ल्यूएस) नोंद घेण्यात आलेली नाही. याशिवाय नावातील स्पेलिंग बदल करण्याबाबत विद्यार्थ्यांकडून निवेदने येत आहेत. विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जात-संवर्ग दुरुस्तीची सुविधा mahatet.in या संकेतस्थळावरील विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिली आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी त्यांची निवेदने 23 मार्चपर्यंत देण्यासही श्री. सुपे यांनी सांगितले आहे. नावातील स्पेलिंगमध्ये दुरुस्ती करण्यासाठी दहावीचे प्रमाणपत्र तर जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी जरी लेखी निवेदन दिले असले तरी त्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन अपडेट करणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुदतीनंतर तसेच इ-मेल, फोन, लेखी पत्राद्वारे आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी केलेल्या दुरुस्त्यांचा विचार करूनच "टीईटी' परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सुपे यांनी त्या पत्रात म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TET offers a five percent discount on SEBC, EWS students