esakal | ठाकरे सरकारचा नारा ! नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर
sakal

बोलून बातमी शोधा

20201018_225228.jpg

नुकसानग्रस्तांना दिला मानसिक आधार 
राज्यात परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील बहूतेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला. शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. पिकांच्या नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे, पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्‍ती व जनावरांचे पंचनामे सुरु आहेत. मात्र, प्रत्यक्षात मदत कधीपर्यंत मिळणार, याच्या चिंतेत असलेल्या नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या (सोमवारी) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते मिलिंद नॉर्वेकर यांनी नवे स्लोगन तयार केले आहे. 'नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर' यातून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

ठाकरे सरकारचा नारा ! नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे शक्‍य नसल्याचे वक्‍तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 17) पंढरपुरात केले. त्यानंतर चिंतेत सापडलेल्या बळीराजाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नॉर्वेकर यांनी 'नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर' या स्लोगनद्वारे बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकसानग्रस्तांना दिला मानसिक आधार 
राज्यात परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील बहूतेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला. शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. पिकांच्या नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे, पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्‍ती व जनावरांचे पंचनामे सुरु आहेत. मात्र, प्रत्यक्षात मदत कधीपर्यंत मिळणार, याच्या चिंतेत असलेल्या नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या (सोमवारी) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते मिलिंद नॉर्वेकर यांनी नवे स्लोगन तयार केले आहे. 'नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर' यातून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पुणे, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, बीड यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर घरांची पडझडही मोठ्या प्रमाणावर झाली असून 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जनावरेही वाहून गेल्याची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठविली आहे. मात्र, अद्याप कोणालाही तातडीची मदत मिळालेली नाही. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे बाहेरुन कर्ज काढून सहा महिन्यांपासून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना निश्‍चितपणे मदत केली जाईल, त्यांनी धीर सोडू नये अशी पोस्टरबाजी करीत शिवसेनेने नुकसानग्रस्तांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता उद्या (सोमवारी) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नुकसानग्रस्तांसाठी कधीपर्यंत आणि किती मदत जाहीर करणार, याची उत्सुकता लागली आहे.