लॉकडाउनमुळे बंद असलेल्या शाळेतून संगणकांची चोरी 

Theft of computers from a school closed due to lockdown
Theft of computers from a school closed due to lockdown
Updated on

वेळापूर (ता. माळशिर, जि. सोलापूर) : लॉकडाउनमुळे बंद असलेल्याशाळेतील आठ संगणक चोरट्यांनी लंपास केल्याची वेळापूर येथे घडली आहे. 
चोरटयांनी वेळापूर येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेतील संगणक कक्षाचे कुलूप तोडून आठ संगणक मॉनिटर चोरीला गेल्याची (ता. 18) फिर्याद शाळेचे मुख्याध्यापक मारुती क्षीरसागर यांनी वेळापूर पोलिसांत दाखल केली आहे. कोविड -19 च्या पार्श्ववभूमीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार 16 मार्चपासून शाळा बंद होती. स्थानिकचे शिक्षक झाडांना पाणी घालणे, कार्यालय, संगणक कक्ष सुरक्षित आहे का, यावर अधूनमधून लक्ष ठेवून होते. शिक्षकांच्या माहितीप्रमाणे शनिवार (ता. 16) रोजी संगणक कक्ष कुलूपबंद सुस्थितीत होता. सोमवार (ता. 18) रोजी शाळेच्या मैदानात खेळायला आलेल्या मुलांकडून संगणक कक्षाचे कुलूप तोडून बाजूला पडल्याचा फोन आल्यांनतर पाहणी केली असता हा प्रकार स्थानिक शिक्षकांच्या लक्ष्यात आला. वेळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्र हाती घेतली. 
ऑगस्ट 2019 मध्ये शाळेने 16 संगणकाच्या लोक सहभागातून उभारलेल्या अद्ययावत 'युनिक कॉप्युटर लॅब' चे उद्घाटन सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. यापैकी मोठ्या स्क्रीनचे सॅमसंग कंपनीचे सुमारे 40 हजार रुपये किमतीचे आठ मॉनिटर चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com