चोरट्यांचे पोलिसांना आव्हान! चार ठिकाणी फोडली दुकाने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

विजापूर नाका परिसरातील अपना बझारचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील कॅश काऊंटरमधून 15 हजार चोरून नेले. राघवेंद्र हॉस्पिटल परिसरातील मेडीकलचे शटर उचकटून कॅश काऊंटरमधील रोकड चोरून नेली आहे.

सोलापूर : विजापूर नाका परिसरातील अपना बझार, मेडीकल, चप्पल दुकान फोडून रोकड चोरली तसेच एका बंगल्यातील गणपतीचा मुकुट चोरी केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. चोरट्यांनी पाळत ठेवून दुकाने आणि बंगला फोडल्याचा अंदाज आहे.

विजापूर नाका परिसरातील अपना बझारचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील कॅश काऊंटरमधून 15 हजार चोरून नेले. राघवेंद्र हॉस्पिटल परिसरातील मेडीकलचे शटर उचकटून कॅश काऊंटरमधील रोकड चोरून नेली आहे. शेजारीच असलेल्या चप्पल दुकानातही चोरी झाली आहे. तसेच निर्मिती विहार परिसरात एक बंद घर फोडून आतील गणपतीचा मुकुट चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in four places