तूर विकल्याचे पैसे घरात ठेवले अन्‌ 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

फिर्यादीने दोन दिवसांपूर्वी अफजलपूर (जि. कलबुर्गी) येथील आडत बाजारात तूर विकल्यानंतर मिळालेले दोन लाख रुपये घरात ठेवले होते. काल (ता. 15) रात्री नऊ वाजता फिर्यादी व पत्नी सुरेखा फिर्यादीचा मित्र सिद्धमल शिवप्पा हेगोडे यांच्या मुलाच्या हळदी कार्यक्रमास गेले होते.

अक्कलकोट (सोलापूर) : घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरात ठेवलेले रोख दोन लाख रुपये व 85 हजारांचे सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख 85 हजारांची चोरी केली. ही चोरी हिळ्ळी (ता. अक्कलकोट) येथे घडली असून दक्षिण पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. 
चोरीची फिर्याद रेवणसिद्ध पंडित डोळ्ळे यांनी दिली आहे. फिर्यादीने दोन दिवसांपूर्वी अफजलपूर (जि. कलबुर्गी) येथील आडत बाजारात तूर विकल्यानंतर मिळालेले दोन लाख रुपये घरात ठेवले होते. रात्री नऊ वाजता फिर्यादी व पत्नी सुरेखा फिर्यादीचा मित्र सिद्धमल शिवप्पा हेगोडे यांच्या मुलाच्या हळदी कार्यक्रमास गेले होते. कार्यक्रमानंतर रात्री घरी आल्यानंतर कुलूप लावून ते नेहमीप्रमाणे पत्रा शेडमध्ये झोपले. पहाटे फिर्यादीची काकू इरव्वा श्रीशैल डोळ्ळे यांनी चोर आल्याचे ओरडून सांगितले. फिर्यादीने घराकडे जाऊन पाहिले असता कडीकोयंडा तोडल्याने घराचा दरवाजा उघडा दिसला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. गोदरेज कपाटाचा दरवाजा उघडा होता. कपाटातील रोख रक्कम दोन लाख व सोने चोरट्याने चोरले होते. यात एक तोळ्याचे मंगळसूत्र किमंत 30 हजार रुपये, अर्धा तोळ्याच्या दोन अंगठ्या किंमत 30 हजार रुपये, अर्धा तोळ्याची कर्णफुले वेल किमंत 15 हजार रुपये व 10 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पाच अंगठ्या असे एकूण दोन लाख 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम आदीचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of two lakh 85 thousand in Akalkot taluka