"पदवीधर व शिक्षक' निवडणुकीसाठी सांगोला तालुक्‍यामध्ये 17 मतदान केंद्रे 

matadan_kendra
matadan_kendra

सांगोला (सोलापूर) : पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगोला तालुक्‍यामध्ये 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, या 17 मतदार केंद्रांवरून पदवीधर मतदार संघासाठी 3 हजार 899 व शिक्षक मतदारसंघात संघासाठी 1 हजार 307 असे एकूण 5 हजार 206 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 104 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली. 

सांगोला तालुक्‍यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदार संघाच्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्‍यात एकूण 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये हातीद, ह. मंगेवाडी, पाचेगाव खुर्द, मिसाळवाडी, नलवडे वाडी, जुजारपूर, गुणापावाडी, उदनवाडी, झापाचीवाडी, कारंडेवाडी, राजुरी, वाटंबरे, सोनंद, डोंगरगाव, गळवेवाडी, काशीदवाडी, मानेगाव, निजामपूर, लोणविरे, हणमंतगाव, अकोला व कडलास या 22 गावांमधील 149 शिक्षक मतदारांसाठी व 594 पदवीधर मतदारांसाठी हातीद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हातीद येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. जवळा, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी, हांगिरगे, गावडेवाडी, घेरडी, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे, डिकसळ, नराळे, हबिसेवाडी या 14 गावांमधील 111 शिक्षक मतदारांसाठी व 157 पदवीधर मतदारांसाठी जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. 

कोळा, कोंबडवाडी, किडबिसरी, पाचेगाव, जुनोनी, काळूबाळूवाडी, बुद्धेहाळ, कारंडेवाडी, गौडवाडी, चोपडी, बंडगरवाडी या अकरा गावांमधील 111 शिक्षक मतदारांसाठी व 273 पदवीधर मतदारांसाठी कोळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळा नवीन इमारतीमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. महूद बु, महिम, कारंडेवाडी, कटफळ, इटकी, खवासपूर, चिकमहूद, लोटेवाडी, नवीलोटेवाडी या 9 गावांमधील 104 शिक्षक मतदारांसाठी व 350 पदवीधर मतदारांसाठी महूद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महूद बु. येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. नाझरा, सरगर वाडी, वझरे, अनकढाळ, चिनके, अजनाळे, लिगडेवाडी, य. मंगेवाडी, बलवडी या 9 गावांमधील 114 शिक्षक मतदारांसाठी व 258 शिक्षक मतदारांसाठी नाझरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाजरा येथे मतदान केंद्र उभे करण्यात आले आहे. 

सांगोला, चिंचोली, कमलापूर, गोडसेवाडी, वाढेगाव, राजापूर, वासूद, केदारवाडी, मेडशिंगी, बुरलेवाडी, आलेगाव, शिवणे, एखतपुर, वाकी शिवणे, नरळेवाडी, बागलवाडी, सोनलवाडी, अचकदाणी, लक्ष्मीनगर, गायगव्हाण, खिलारवाडी या 21 गावांमधील 628 शिक्षक मतदारांसाठी व 2 हजार 267 पदवीधर मतदारांसाठी सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच संगेवाडी, शिरभावी, मेटकरवाडी, मांजरी, देवकतेवाडी, मेथवडे, देवळे, हलदहिवडी, बामणी, सावे येथील 90 शिक्षक मतदार व पदवीधर मतदारांसाठी संगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र उभारण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक मुख्य अधिकारी व इतर तीन ते चार अधिकारी असे एकूण 104 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com