महूदमध्ये आता कोरोनासह डेंग्यू, मलेरिया या साथ रोगांचीही भीती

There are fears of diseases like dengue and malaria along with corona in Mahud.jpg
There are fears of diseases like dengue and malaria along with corona in Mahud.jpg
Updated on

महूद (ता.सांगोला) : येथील कचरा गोळा करणारी घंटागाडी सुमारे एक महिन्यापासून बंद असल्याने कोरोना उद्रेकाच्या काळात महूद येथील ग्रामस्थांना  कोरोना बरोबरच डेंगू, मलेरिया या साथ रोगांनाही सामोरे जावे लागत आहे. घंटागाडी तात्काळ सुरू करावी, अन्यथा ग्रामपंचायत समोर कचरा टाकला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महूद येथील बंद असणारी घंटागाडी ताबडतोब सुरु करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साथ उद्रेकाच्या काळात महूद गावात असंख्य कोरोना रुग्ण असतानाही घंटा गाडी बंद करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती व सूचना देण्यात आली नाही.

अचानक परस्पर ग्रामपंचायतीने ही घंटा गाडी बंद केलेली आहे. त्यामुळे नागरिकांसमोर कचरा टाकण्याची मोठी समस्या निर्माण झाली. अनेकांनी घरासमोरच कचऱ्याचे ढीग लावले आहेत. तर गावात असणार्‍या मोकळ्या व पडक्या जागाशिवाय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रिकाम्या जागेत नागरिक उघड्यावर कचरा टाकत आहेत.

वारंवार पडणारा पाऊस आणि त्यामुळे तयार होणाऱ्या खराब वातावरणामुळे रस्त्यात, गावात इतरत्र पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे गावात डास व माशांचे प्रमाण वाढलेले आहे. कोरोना बरोबरच गावात डेंगू, मलेरिया यासारख्या साथ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी घंटागाडी बाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर दिले जात नाही.

कोरोना साथ रोगाच्या काळातील ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्रासलेल्या नागरिकांनी घंटागाडी तात्काळ सुरू न केल्यास गावातील कचरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ओतला जाईल, असा इशारा दिला आहे. राज्यातील व देशभरातील संस्थाच्या कोट्यावधी रुपयांच्या सहयोगातून येथील कासाळ  ओढ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. कासाळ ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करून त्यास गतवैभव प्राप्त करून देण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. मात्र येथील व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे ओढ्यात ही नागरिक कचरा व घाण टाकत आहेत.

कचरा उचलण्या बाबतीत दुर्लक्ष होत असतानाच पाणीपुरवठा व वीजपुरवठा याचाही बोजवारा उडाला आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने येथे पूर येऊन ओढा-नाले भरभरून वाहत आहेत. तरीही नियोजन नसल्याने गावात आठवडा आठवडा पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा योजनेस स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर असण्याची आवश्यकता आहे. तर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गावाच्या काही भागात आठवडा-आठवडा वीजपुरवठा खंडित असतो. घंटागाडी, पाणीपुरवठा व वीजपुरवठा याबाबत ग्रामपंचायतीने गांभीर्याने काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

महूदचे ग्रामस्थ सचिन जाधव म्हणाले, महूद ग्रामपंचायत नागरिकांच्या प्रश्नाबाबत व सार्वजनिक आरोग्याबाबत अजिबात जागरूक नाही  महिनाभर घंटागाडी बंद ठेवण्यात आली आहे. ही घंटागाडी तात्काळ सुरू करावी, अन्यथा ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर केर-कचरा आणून टाकतील. त्याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील.
  

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com