अक्‍कलकोट, उत्तर व दक्षिण सोलापुरात आज रुग्ण नाही ! आज 59 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू 

1Corona_93_0.jpg
1Corona_93_0.jpg
Updated on

सोलापूर : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे, परंतु मृतांची संख्या आटोक्‍यात आलेली नाही. दररोज सरासरी तिघांचा मृत्यू होत असून त्यात सर्वाधिक को- मॉर्बिड रुग्णांचाच समावेश आहे. आज उत्तर व दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट वगळता उर्वरित आठ तालुक्‍यांत 59 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे बनजगोळ (ता. अक्‍कलकोट) येथील 43 वर्षीय पुरुष, पाटकूल (ता. मोहोळ) येथील 80 वर्षीय पुरुष आणि जवळा (ता. सांगोला) येथील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील तीन लाख 91 हजार 159 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत ग्रामीणमधील 23 हजार 502 पुरुष आणि 14 हजार 414 महिलांना कोरोनाची बाधा 
  • आज (रविवारी) एक हजार 852 संशयितांमध्ये आढळले 59 कोरोना पॉझिटिव्ह 
  • 43 वर्षांवरील तिघांचा कोरोनाने घेतला बळी; मृतांची संख्या एक हजार 118 
  • उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट आणि दक्षिण सोलापुरात रविवारी आढळला नाही एकही रुग्ण 

ग्रामीण भागातील रुग्णांच्या संपर्कातील दहा हजार 774 संशयित होम क्‍वारंटाईन असून दोन हजार 533 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यात ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या आता सहा झाली असून हा तालुका आता ग्रीन झोनमध्ये आला आहे. तर अक्‍कलकोटमध्ये 26, बार्शीत 91, करमाळ्यात 144, माढ्यात 147, माळशिरसमध्ये 103, मंगळवेढ्यात 52, मोहोळमधील 46, पंढरपुरातील 118, सांगोल्यातील 113 आणि दक्षिण सोलापुरातील 22 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित 35 हजार 930 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातच सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com