दिलासादायक! शहरातील 'या' प्रभागांमध्ये आज एकही रुग्ण नाही; 287 अहवालात 44 नवे पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Tuesday, 4 August 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील एकूण 36 हजार 651 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले पाच हजार 190 कोरोना पॉझिटिव्ह 
  • रुग्णांच्या संपर्कातील 245 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित 
  • आज शहरातील 287 पैकी 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत तीन हजार 378 रुग्णांची कोरोनावर मात; आज 126 रुग्णांना घरी सोडले 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. आज शहरातील 287 पैकी 44 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान, प्रभाग क्रमांक एक, दोन, सात, नऊ, 12, 17, 19 या प्रभागांमध्ये आज एकही रुग्ण सापडलेला नाही. 

 

नवीपेठ, मुस्लिम कब्रस्तानजवळ (सिध्देश्‍वर मंदिर परिसर), मजरेवाडी, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), हराळे नगर (कुमठा रोड), भवानी पेठ, विष्णू नगर (स्वागत नगराजवळ), रेवणसिध्देश्‍वर नगर, आंबेडकर नगर (होटगी रोड), कृष्णा वसाहत (विडी घरकूल), शिक्षक सोसायटी (दक्षिण सदर बझार), मुरारजी पेठ, झुरले नगर, सलगर वस्ती, मौलाना चौक (नई जिंदगी), रविंद्र नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), प्रताप नगर (विजयपूर रोड), विजया हौसिंग सोसायटी (कुमठे), गंगाई केकडे नगर (मुळेगाव रोड), कोटा नगर (राघवेंद्र मंदिराजवळ), रंगराज नगर (जुना विडी घरकूल), मल्लिकार्जुन नगर (अक्‍कलकोट रोड), मुस्लिम पाच्छा पेठ, न्यू लक्ष्मी चाळ, राजीव गांधी नगर, ज्ञानेश्‍वर नगर (विजयपूर रोड), थोबडे वस्ती (देगाव नाका), समर्थ नगर, संतोष नगर (जुळे सोलापूर) याठिकाणी आज नव्या रुग्णांची भर पडली. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या पाच हजार 190 झाली आहे. 

 

शहरातील 16 प्रभागांमध्ये आढळले नवे रुग्ण 
महापालिका अन्‌ पोलीस प्रशासनाच्या मदतीने नगरसेवकांनी आता आपापला प्रभाग कोरोनामुक्‍त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (ता. 4) प्रभाग क्रमांक चार, पाच, सहा, आठ, दहा, 11, 14, 16, 18, 20 ते 26 या प्रभागांमध्ये आज नव्याने रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, प्रभाग समित्यांच्या माध्यमातून आता घरोघरी जाऊन ऍन्टीजेन टेस्टचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यातून टेस्टची संख्या वाढली असून आता शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील एकूण 36 हजार 651 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले पाच हजार 190 कोरोना पॉझिटिव्ह 
  • रुग्णांच्या संपर्कातील 245 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित 
  • आज शहरातील 287 पैकी 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत तीन हजार 378 रुग्णांची कोरोनावर मात; आज 126 रुग्णांना घरी सोडले 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are no patients in the total seven wards of the solapur city today 287 in the report and 44 new positives