
ठळक बाबी...
सोलापूर : शहरात आतापर्यंत दहा हजार 442 रुग्ण आढळले आहेत. आज शहरातील 752 संशयितांमध्ये 36 रुग्ण आढळले असून 47 वर्षीय एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसुत्रीचा वापर करुन निश्चितपणे कोरोनाला हद्दपार करु, असा निर्धार महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
ठळक बाबी...
शहरात आज भवानी पेठ, टिळक चौक (उत्तर कसबा), शुक्रवार पेठ (भांडी गल्लीजवळ), व्यंकटेश सोसायटी (विकास नगर), बुधवार पेठ, विश्रांती चौक, रुपाभवानी रोड (भवानी पेठ), लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), शिवाजी नगर, चाणक्य नगर, ओमगर्जना चौक, जयकुमार नगर, समर्थ नगर (विजयपूर रोड), अवसे वस्ती (आमराई), सिरत नगर, आदित्य नगर, शिवगंगा नगर (जुळे सोलापूर), अशोक चौक, मुरारजी पेठ (राधेकृष्ण कॉलनी), सनसिटी (दमाणी नगर), भाग्योदय सोसायटी, पद्मश्री अपार्टमेंट (अवंती नगर), मोदी (सात रस्ता), नेहरु नगर, एसआरपी कॅम्प (सोरेगाव), जमादार वस्ती (निलम नगर), गणेश हॉल (रेल्वे कॉलनी), तेजप्रकाश अपार्टमेंट (मोदीखाना) आणि पी. जी. बॉईज हॉस्टेल येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, शहरातील नऊ हजार 459 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून दुसरीकडे 563 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या 256 पुरुष आणि 164 महिला रुग्ण शिल्लक असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.