विद्यापीठाची प्रश्‍नपत्रिका बहूपर्यायीच ! 50 गुणांसाठी एक तासाचा वेळ; पुनर्मूल्यांकन व फोटोकॉपी मिळणार नाही 

तात्या लांडगे
Friday, 22 January 2021

विद्यापीठाच्या परिपत्रकातील ठळक बाबी... 

 • आगामी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका बहूपर्यायीच; विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी व पासवर्ड पडताळावे 
 • 50 प्रश्‍नांची असणार प्रश्‍नपत्रिका; प्रत्येक प्रश्‍नासाठी दिले जातील एक गुण 
 • प्रत्येक पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळेल एक तासाचा वेळ; दिव्यांगांसाठी 30 मिनिटांचा अतिरिक्‍त वेळ 
 • नेट कनेक्‍टिव्हीटी गेल्यास उर्वरित प्रश्‍न सोडविण्यासाठी तीन तासांचा वेळ मिळेल 
 • पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 24 जानेवारीपासून परीक्षा 
 • प्रश्‍नपत्रिका बहूपर्यायी असल्याने फोटोकॉपी मिळणार नाही; पुनर्मूल्यांकनासाठीही करता येणार नाही अर्ज 

सोलापूर : दरवर्षी ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये होणारी सत्र परीक्षा कोरोनामुळे जानेवारीत घेतली जात आहे. राज्यातील एकही महाविद्यालय सुरु झाले नसून विद्यार्थ्यांना आगामी सत्र परीक्षा ऑनलाईनच द्यावी लागणार आहे. 50 गुणांची बहूपर्यायी प्रश्‍नपत्रिका असणार असून त्यासाठी एक तासांचा वेळ दिला जाणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत शिकणाऱ्या द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा 24 जानेवारीपासून सुरु होत आहे.

विद्यापीठाच्या परिपत्रकातील ठळक बाबी... 

 • आगामी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका बहूपर्यायीच; विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी व पासवर्ड पडताळावे 
 • 50 प्रश्‍नांची असणार प्रश्‍नपत्रिका; प्रत्येक प्रश्‍नासाठी दिले जातील एक गुण 
 • प्रत्येक पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळेल एक तासाचा वेळ; दिव्यांगांसाठी 30 मिनिटांचा अतिरिक्‍त वेळ 
 • नेट कनेक्‍टिव्हीटी गेल्यास उर्वरित प्रश्‍न सोडविण्यासाठी तीन तासांचा वेळ मिळेल 
 • पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 24 जानेवारीपासून परीक्षा 
 • प्रश्‍नपत्रिका बहूपर्यायी असल्याने फोटोकॉपी मिळणार नाही; पुनर्मूल्यांकनासाठीही करता येणार नाही अर्ज 

विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन, लॅपटॉप अथवा डेस्टटॉपद्वारे ही परीक्षा द्यावी, असे विद्यापीठाने आवाहन केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अशी सोय नाही, त्यांनी त्यांच्या मित्र, नातेवाईकाकडे स्वत:ची व्यवस्था करावी. त्याठिकाणी शक्‍य नसल्यास जवळील महाविद्यालयातील संगणक संच वापरता येतील, असेही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट आयोजित केली जाणार असून वेळोवेळी त्यातून माहिती दिली जाईल, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांशी संपर्क राहावा म्हणून महाविद्यालयांनी अभ्यासक्रमनिहाय व्हॉट्‌सअप, टेलिग्रामचे ग्रूप तयार करावेत, असे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. कॉपीविरहीत परीक्षा पार पडेल, असा विश्‍वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी केले आहे. ही परीक्षा ऑनलाइन होणार असून बहूपर्यायी प्रश्‍नपत्रिका असल्याने निकालासाठी कमी वेळ लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a multiple choice question paper of 50 marks; One hour for 50 points; Revaluation and photo copying will not be available