
करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र शासनाच्या "माझी वसुंधरा' अभियानांतर्गत करमाळा नगरपरिषद निसर्गाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातत आहेत. या अभियानांतर्गत "चला आपले करमाळा स्वच्छ, सुंदर बनवू या ! आपल्या वसुंधरेला हिरवा शालू नेसवू या! सौरऊर्जेचा वापर करू या! आपल्या शहराला प्रदूषणमुक्त करू या! हरित कायद्याचे पालन करू या!' असा संकल्प करण्याचे आवाहन करमाळा नगरपरिषदेने करमाळकरांना केले आहे.
प्रदूषणमुक्त करमाळा करण्याकरिता सर्व नागरिकांनी, व्यापारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी व चारचाकीचा वापर कमी करून सायकल वापर वाढवावा, याकरिता आवाहन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दर मंगळवारी प्रत्येक कर्मचाऱ्याने सायकल किंवा इलेक्ट्रिक बाईकचा वापर करण्याचे ठरविले आहे व दर मंगळवारी "नो व्हेईकल डे' म्हणून पाळण्यात येणार आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी दर मंगळवारी हा "नो व्हेईकल डे' पाळण्याकरिता आपल्या कर्मचाऱ्यांना आवाहन करण्याची विनंती मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केली आहे.
या उपक्रमात स्वत: मुख्याधिकारी व करमाळा नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला असून, या सर्वांना नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे मार्गदर्शन करत आहेत.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व करमाळकरांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड, नो व्हेईकल डे, सायकलचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे निर्मिती, सौर ऊर्जेचा वापर व किचन कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती या उपक्रमांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा व आपलं करमाळा स्वच्छ, सुंदर, हरित व प्रदूषणमुक्त करावा.
- वैभवराजे जगताप,
नगराध्यक्ष, करमाळा नगरपरिषद, करमाळा
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.