कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नातेपुते शहरात प्रभागनिहाय अँटिजेन टेस्ट

सुनील राऊत 
Tuesday, 20 October 2020

नातेपुते शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रभागनिहाय रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय सोमवारी (ता. 19) तातडीने नातेपुते ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

नातेपुते (सोलापूर) : नातेपुते शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रभागनिहाय रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय सोमवारी (ता. 19) तातडीने नातेपुते ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

या बैठकीला सरपंच ऍड. भानुदास राऊत, माजी सरपंच अमरशील देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अजय भांड, सुनीता सोरटे, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. पी. मोरे, मांडवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे व सामाजिक कार्यकर्ते लतीफ नदाफ, आरोग्य सहाय्यक एस. ए. नाकुरे आदी उपस्थित होते. 

सध्या नातेपुते शहरात सुमारे 735 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तपासणीच्या 25 टक्के रुग्ण आढळून येत आहेत. मांडवे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रभागनिहाय अँटिजेन टेस्ट घेण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. 

तारखेनुसार गावांमध्ये होणारे टेस्ट 
ता. 20 : पांढरे मळा, ता. 21 : बाजार तळ, घडशी गल्ली, ता. 22 : खडक गल्ली, कोष्टी गल्ली, ता. 23 : अहिल्यादेवी चौक, ता. 24 : हनुमान गल्ली, लोकमान्य चौक, गोंधळी गल्ली, ता. 25 : बौद्ध नगर, साठे नगर, ता. 26 : समाजभूषण नगर व खाटीक गल्ली, ता. 27 : बोराटे वस्ती, काळे वस्ती आणि 44 फाटा पांढरे मळा, ता. 28 : बरडकर मळा, टेंबरे मळा, ता. 29 : ज्योतिबा नगर येथे टेस्ट होणार आहेत. 

यापूर्वी पालखी मैदान, शिक्षक बॅंक, देवकाते वस्ती आणि उमाजी नाईक नगर येथे तपासणी झाली आहे. या शिबिरामध्ये नागरिकांनी सहकुटुंब येऊन विनामूल्य तपासणी करून घ्यावे, असे आवाहन सरपंच भानुदास राऊत व डॉ. पाटील यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will now be a ward-wise antigen test in the city of Natepute to prevent corona infection