बंद घरातून मारला चोरट्याने अडीच लाखांचा डल्ला !

तात्या लांडगे 
Tuesday, 1 September 2020

कोरोनाबाधित तथा त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींना विलगीकरण केंद्रात हलविल्यानंतर त्यांच्या बंद घरांवर चोरट्यांनी वॉच ठेवायला सुरू केले आहे. त्यानुसार काहींच्या घरात यापूर्वीही चोरी झाली आहे. आता काही कामानिमित्त परगावी गेलेल्या घरांचा शोध घेऊन चोरटे पहाटेच्या सुमारास घरफोडी करू लागले आहेत. 

सोलापूर : शहरातील आर्य चाणक्‍य नगर (जुळे सोलापूर) येथील ज्ञानेश्‍वर रेवणसिद्ध साखरे हे त्यांच्या वडिलांना हृदविकाराचा झटका आल्याने घराला कुलूप लावून गावी केले. 19 ऑगस्टला साखरे कुटुंबीय मूळगावी पोचले. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात चोरी करून तब्बल दोन लाख 62 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 

कोरोनाबाधित तथा त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींना विलगीकरण केंद्रात हलविल्यानंतर त्यांच्या बंद घरांवर चोरट्यांनी वॉच ठेवायला सुरू केले आहे. त्यानुसार काहींच्या घरात यापूर्वीही चोरी झाली आहे. आता काही कामानिमित्त परगावी गेलेल्या घरांचा शोध घेऊन चोरटे पहाटेच्या सुमारास घरफोडी करू लागले आहेत. एकीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती, विलगीकरणात राहण्याची भीती तसेच आता घर सोडून परगावी जाण्याची भीतीही सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. 

दरम्यान, आर्य चाणक्‍य नगर (जुळे सोलापूर) येथील ज्ञानेश्‍वर साखरे हे त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने 19 ऑगस्टला मूळगावी गेले होते. चोरट्याने ही संधी साधली आणि घरफोडी केली. घराचे मेन गेट आणि लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर पाच तोळे सोने, 21 तोळे चांदीचे दागिने, 40 हजारांची रोकड, शालू, साड्या, मुलांचे कपडे असा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. कोल्हाळ करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A thief broke the lock of the locked house and stole Rs two and half lakhs