अबब ! सोलापूर मार्केट यार्डातील दुकान फोडून चोरट्यांनी पळवला लसूण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

शहरातील मार्केट यार्डातील दुकान फोडून साडेबारा हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद हारीस अब्दुल रौफ बागवान (रा. शनिवार पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. दुकानात काम करणारा मजूर दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे दिसले.

 

सोलापूर : शहरातील मार्केट यार्डातील दुकान फोडून 30 किलो चिंचेचे आठ पॅकेट व दीड हजार रुपयांचा लसूण चोरुन नेला आहे. 
शहरातील मार्केट यार्डातील दुकान फोडून साडेबारा हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद हारीस अब्दुल रौफ बागवान (रा. शनिवार पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. दुकानात काम करणारा मजूर दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे दिसले. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यानंतर त्याने मालकास बोलावून घेतले. चोरट्याने दुकानातून अकरा हजार रुपये किंमतीचे 30 किलो चिंचेचे आठ पॅकेट व दीड हजार रुपयांचा लसूण चोरुन नेला आहे, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

ट्रक अपघातप्रकरणी चालकाविरुध्द गुन्हा 
सोलापूर : सायकलवरुन निघालेल्या इस्माईल कामले यांच्या फिर्यादीनुसार मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुध्द जोडभावी पेठ पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. 14) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हैदराबाद रोडवरील मार्केट यार्डासमोर सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून इस्माईल यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यासाठी ट्रकचालक लहू सुभाष राठोड (रा. औसा तांडा, जि. लातूर) हा कारणीभूत ठरल्याने त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. इम्रान इस्माईल कामले यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

तरूणास लोखंडी सळईने मारहाण 
सोलापूर : किरकोळ कारणावरून तरुणास लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी निखिल नागमोती व प्रद्यूम्न नागमोती (रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ) यांच्याविरुध्द जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (ता. 13) काडादी हायस्कूल परिसरात ही घटना घडली. यल्लाप्पा शाहू सौदागर हा घरी जात होता. त्यावेळी त्याचा मित्र निखिलने यल्लाप्पा सौदागर याला फोन करून दुचाकीवर बसवून काडादी हायस्कूल येथे आणले. त्यावेळी निखिल याने तू माझ्या दुकानापासून का फिरतो, असे विचारत मारहाण केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves broke into a shop in Solapur Market Yard and stole garlic