चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी मेंढपाळाचे बोकड, मेंढा चोरला ! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी

तात्या लांडगे
Tuesday, 20 October 2020

दोन अनोळखी व्यक्‍तींनी त्यांना दमदाटी करुन चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर त्या दोघांनी बोकड व मेंढा चोरून नेला. त्याची अंदाजित किंमत 57 हजार रूपये होती, अशी फिर्याद लोखंडे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. 

सोलापूर : कर्नाटकातील आरकेरी येथील मेंढपाळ एकनाथ नामदेव लोखंडे हे शनिवारी (ता. 17) एसआरपी कॅम्पजवळील मोकळ्या मैदानात मेंढ्या, शेळ्या चारत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्‍तींनी त्यांना दमदाटी करुन चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर त्या दोघांनी बोकड व मेंढा चोरून नेला. त्याची अंदाजित किंमत 57 हजार रूपये होती, अशी फिर्याद लोखंडे यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. 

माहेरुन पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ 
सोलापूर : दुचाकी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आण, व्यवसायासाठी तीन लाख रुपये आणून दे म्हणत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, चुलत सासरे व त्याच्या पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सोनाली दीक्षित (रा. गीता नगरजवळ, कमटम वसाहत) यांनी फिर्याद दिली. तू अपंग आहेस, मला चांगली बायको मिळाली असती, असे म्हणून शिविगाळ व मारहाण केली. चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिल्याचेही फिर्यादीत नमुद केले आहे. 

मोबाईलवरून 71 हजारांची ऑनलाइन फसवणूक 
सोलापूर : भवानी पेठ परिसरातील नीलकंठेश्वर मंदिराजवळ राहणारे उमेश दीनानाथ धूळम यांना एका नंबर वरून फोन आला. तुमचे केवायसी करायचे आहे, सांगून त्यांनी क्विक सपोर्ट व ब्रिझ ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते दोन्ही ऍप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलवरील ओटीपीवरुन त्यांच्या पेटीएमवरून 49 हजार रुपये 904 रुपये व पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यावरून अकरा हजार रुपये आणि त्यांचा भाऊ आनंद देवण्णा म्हंता यांच्या आंध्रा बॅंकेच्या खात्यातून दहा हजार 467 रुपये कपात झाल्याची घटना सहा जून रोजी घडली होती. याप्रकरणी रविवारी जोडभावी पोलीस त्या मोबाईल क्रमांकाविरुद्ध फिर्याद नोंदविण्यात आले आहेत. 

ट्रकचालकाविरुध्द एमआयडीसी पोलिसांत गुन्हा 
सोलापूर : शहरातील काम आटोपून गावी (आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर) निघालेल्या भिमाशंकर ऊर्फ बब्रू बाबुराव विधाते यांचा रविवारी (ता. 18) अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या दुकचाकीला ट्रकने (एमएच- 26, एच- 7154) मागून धडक दिली. या अपघातात डोक्‍याला व खांद्याला जबर दुखापत झाल्याने विधाते यांचा जागीचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजी राघोबा कलमदाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचालक धनाजी संजय चव्हाण (रा. अरसोली, ता. भूम) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the thieves stole the goat, the sheep