अकरावी प्रवेश : तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध; 'विज्ञान'चा कट ऑफ 89.60 टक्‍क्‍यांवर 

संतोष सिरसट 
Tuesday, 8 September 2020

यंदाच्या वर्षी दहावीचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला होता. अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांच्या पुढे गुण मिळाले होते. तरीही त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात 90 टक्के गुण मिळवूनही प्रवेश मिळाला नसल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत. विज्ञान शाखेला 90 टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. 

सोलापूर : अकरावी प्रवेशाची तिसरी व अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र सोलापूर शहरातील मुख्य महाविद्यालयात तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्धच झाली नाही. दुसऱ्या गुणवत्ता यादीअखेरच त्यांच्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याने तिसऱ्या गुणवत्ता यादीची आवश्‍यकता पडली नाही. विज्ञान शाखेसाठी तिसऱ्या गुणवत्ता यादीचा कट ऑफ भारती विद्यापीठात 89.60 टक्के इतका झाला आहे. 

यंदाच्या वर्षी दहावीचा निकाल मोठ्या प्रमाणात लागला होता. अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांच्या पुढे गुण मिळाले होते. तरीही त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात 90 टक्के गुण मिळवूनही प्रवेश मिळाला नसल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत. विज्ञान शाखेला 90 टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील ए. डी. जोशी महाविद्यालय, संगमेश्‍वर महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय या प्रमुख महाविद्यालयांनी तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्धच केली नसल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षण विभागाने दिली आहे. 

दयानंद महाविद्यालयात 86.80 टक्केचा कट ऑफ विज्ञान शाखेसाठी झाला आहे. वाणिज्य शाखेचा कट ऑफ 83.80 टक्के इतका झाला आहे. तिसऱ्या यादीत ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे, त्यांनी मंगळवार (ता. 8) पर्यंत आपापल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, आवाहन प्रभारी शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, सहाय्यक शिक्षण निरीक्षक मिलिंद मोरे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The third merit list of the eleventh admission has been announced