
मळेगाव : बार्शी तालुक्यातील उपळे (दु) येथे एका दिवसात कोरोनाचे 30 रुग्ण सापडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपळे (दु) येथील रुग्ण संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे. मळेगाव, बावीसह ग्रामीण भागात नव्याने रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सध्या उपळे उपळे (दु) येथे येथे कडकडीत बंद पाळला आहे.
ता. 4 सप्टेंबर रोजी उपळे (दु) 215 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर 30 जणांचे अहवाल कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या मृत्युमुळे व वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उपळे (दु) हे गाव परिसरातील झाडी, बोरगाव, निंबळक, कापसी, जामगाव, पिंपरी (आर) गावचं अर्थिक उलाढालीच केंद्र म्हणून ओळखले जाते. शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा, कृषीक्षेत्र, बॅंका, धार्मिक स्थळ, बाजारपेठ यामुळे उपळे गावचा परिसर नेहमी रहदारीचा व गजबजलेला असतो. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेत उपळे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने 4 ते 6 सप्टेंबर या कालवधीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यु लागू केला आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यास जनतेचा उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात निर्जंतुकिकरण फावरणी करण्यात आली आहे. तसेच कोरोना रुग्णाच्या घरचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, उपळे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
संपादन : अरविंद मोटे
महाराष्ट्र सोलापूर बार्शी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.